या अभिनेत्रीच्या आईने तिच्या करियरसाठी विकले होते दागिने.... वयाच्या १३ व्या वर्षी अभिनयक्षेत्रात केले पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 9:44 AM
कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमात या कार्यक्रमात बुआच्या भूमिकेत प्रेक्षकांना उपासना सिंगला पाहायला मिळाले होते. या कार्यक्रमामुळे उपासनाला ...
कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमात या कार्यक्रमात बुआच्या भूमिकेत प्रेक्षकांना उपासना सिंगला पाहायला मिळाले होते. या कार्यक्रमामुळे उपासनाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. उपसना सिंग गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. तिने आजवर जुदाई, सरफरोश, एेतराज, हलचल यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पण उपासनाला खऱ्या अर्थाने ओळख कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे मिळाली. या कार्यक्रमात तिने साकारलेली बुआ प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या कार्यक्रमानंतर तिने द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. द कपिल शर्मा शो नंतर उपासनाने नच बलिये या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील केले होते. पण गेल्या काही दिवसांपासून उपासना छोट्या पडद्यापासून दूर आहे. उपासना सिंगने बाय चली सासरिये या राजस्थानी चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटासाठी तिला १९८८ साली ३५००० रुपये मिळाले होते. त्या काळात ही रक्कम खूपच जास्त होती. उपासना ही मुळची पंजाबमधली असून २९ जून १९७५ ला तिचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासून तिला डॉक्टर बनायचे होते. पण तिने आर्टसला प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत आली. तिने अभिनेत्री होऊ नये असे तिच्या वडिलांचे म्हणणे होते. उपासनाच्या या निर्णयाला वडील पाठिंबा देत नसल्याने तिच्या करियरसाठी तिच्या आईने दागिने विकले होते. उपासनाने वयाच्या १३ व्या वर्षी चित्रलेखा या नाटकात काम केले होते. या नाटकातील तिचा नायक हा ५० वर्षांचा होता. तिने तिच्या कारकिर्दीत पंजाबी, गुजराती आणि हिंदी अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने अभिनेता नीरज भारद्वाजसोबत २००९ मध्ये लग्न केले होते. नीरजने साथ निभाना साथिया या मालिकेत काम केले होते. उपासना आणि नीरजचे लग्नानंतर काही वर्षांतच खटके उडायला लागले. गेल्या पाच वर्षांपासून ते दोघे वेगळेच राहात आहेत. त्यांनी त्यांच्या नात्याला अनेकवेळा वेळ देऊनही पाहिला तरीही काहीही सुधारणा होत नसल्याने आता त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.