बॉलीवूडची 'धक धक गर्ल'च्या अदांवर आजही चाहते घायाळ होतात. सौंदर्याला वयाची बंधनं नसतात याचा परिपाठच जणू अभिनेत्री माधुरी दीक्षितनं घालून दिला असावा असे सुंदर फोटो आजही व्हायरल होतात. वयाच्या ५५ व्या वर्षी देखील माधुरी आपल्या अनोख्या आणि तितक्याच पारंपारिक फॅशननं अनेकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. माधुरी सध्या 'झलक दिखला जा'च्या १० व्या सीझनमध्ये माधुरी दीक्षित परिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. याच सीझनमध्ये स्पर्धकांनी तर लक्ष वेधून घेतलं आहेच. पण माधुरीच्या हटके स्टाइलनं एक वेगळीच मजा या सीझनला येत आहे.
Jhalak Dikhhla Jaa 10: या अभिनेत्रींमध्ये होणार 'काँटे की टक्कर', See Pics
'झलक दिखला जा'च्या शुटिंगवेळीचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या शोचं शुटिंग सध्या मुंबईतील फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. या दरम्यान माधुरीनं एक आकर्षक आणि तितकाच भरजरी लेहंगा परिधान केला होता. माधुरी आणि लेहंगा हे एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे यात काही शंकाच नाही. याचीच प्रचिती या व्हिडिओतूनही येते. शेवाळी रंगाचा लेहंगा त्यावर नारंगी रंगाची बॉर्डर यात माधुरी खुलून दिसत आहे.
माधुरी नुकतीच नेटफ्लिक्सच्या ‘फेम गेम’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. तिच्या कामाची बरीच प्रशंसा झाली. लवकरच ‘मजा मा’ नावाच्या एका चित्रपटातून ती पुन्हा ओटीटीवर झळकणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेबसीरिजमध्येदेखील माधुरी झळकणार असल्याची चर्चा आहे.