Join us

`रील लाईफ`मधल्या लग्नासाठी जिया शंकरने घातले तिच्या आईचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 11:29 AM

`रील लाईफ`मधल्या लग्नासाठी जिया शंकरने घातले तिच्या आईचे दागिने &TV च्या मेरी हानीकारक बिवी या मालिकेने आपल्या बोल्ड संकल्पनेमुळे ...

`रील लाईफ`मधल्या लग्नासाठी जिया शंकरने घातले तिच्या आईचे दागिने &TV च्या मेरी हानीकारक बिवी या मालिकेने आपल्या बोल्ड संकल्पनेमुळे तसेच, यातील रोमांचकारी चढउतारांमुळे रसिक प्रेक्षकांना थक्क केले आहे. या मालिकेत डॉ. ईराची भूमिका साकारलेली जिया शंकर आता एक सुंदर वधूच्या रुपात आपल्यासमोर येऊन प्रेक्षकांना चकित करण्यास सज्ज झाली आहे. पण, तिच्या या `रील लाईफ`मधल्या खोट्या खोट्या लग्नासाठी ही अभिनेत्री तिच्या खर्‍या आईचे खरे दागिने घालणार असल्याची चर्चा आमच्या कानावर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी पडद्यावर भव्य विवाहसोहळा प्रसारित करण्याची तयारी  केली असून ईरासाठी एक स्पेशल लेहेंगाही डिझाईन केला आहे. टीमने लग्नसोहळ्याचा सिक्वेन्स सांगितल्यावर, पडद्यावरची ही ईरा फारच आनंदी झाली असून या सीनला थोडासा वैयक्तिक स्पर्श देण्याचा निर्णय तिने घेतला. आपल्या आईचे दागिने घालता यावेत, अशी विनंती तिने केली आणि तेच दागिने तिने या खास चित्रीकरणादरम्यान घातले आहेत. याबाबत जियाला विचारले असता ती म्हणाली, ``मी खरोखर खूपच उत्साही होते आणि लग्नसोहळ्याच्या चित्रीकरणाच्या तयारीसाठी सेटवर गेले. मला खर्‍याखुर्‍या वधूसारखे दिसायचे होते आणि या सोहळ्याला थोडासा वैयक्तिक स्पर्श द्यावा अशीही माझी इच्छा होती. आमच्या क्रिएटिव्ह टीमने मला लेहेंगा दाखवल्यानंतर तर मी माझ्या आईचे दागिने त्यावर घालण्याची परवानगी मागितली आणि ते दागिने माझ्या कपड्यांना अगदी चपखल मिळतेजुळते होते. केवळ एका सिक्वेन्ससाठी आपले दागिने द्यायला माझी आई तयार झाली नाही. पण, मला वधूच्या पेहरावात पाहिल्यावर मात्र ती लगेच तयार झाली. लग्नामध्ये अशी काहीतरी जादू नक्कीच असते आणि आपल्याशी संबंधित काहीतरी आपल्या मुलीमध्येही पाहता यावे, असे प्रत्येक आईचे स्वप्न असते. यामुळेच, हा सीन माझ्यासाठी अधिक खास बनला. माझा नवा लूक प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि माझ्या रील लाईफच्या लग्नात ते दागिने घातलेल्या मला बघताना आईलाही फार आनंद होईल, याची मला खात्री आहे.`` अखिलेश आणि ईराच्या लग्नसोहळ्याची तयारी आगामी भागात पहायला मिळणार आहे. ईरा अखिलेशशी लग्न करते आहे, हे ईराच्या वडिलांना समजल्यावर तिने तसे केल्यास आपण तिला बेदखल करू अशी ईराच्या वडिलांची धमकी या मालिकेत नवे नाट्य आणणार आहे. अखिलेश मात्र ईराच्या वडिलांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतो.