Join us

मुंबईतल्या जिज्ञासाच्या प्रश्नावलींमुळे परीक्षकाच्या नाकात येतो दम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 8:30 PM

मुंबईमध्ये जी एक स्पिरीट आहे, जी एक बिनधास्त भावना आहे, तशीच भावना आणि तिच एनर्जी मुंबईकर जिज्ञासामध्ये दिसून येते .

ठळक मुद्दे सुपर डान्सर महाराष्ट्र होण्यासाठी चांगलीच रंगलीय चुरसमुंबईची जिज्ञासा भोईला असते आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या स्पर्धकांमध्ये सध्या सुपर डान्सर महाराष्ट्र होण्यासाठी चांगलीच चुरस रंगली आहे. या सगळ्याच स्पर्धकांमध्ये नृत्य कौशल्याबरोबरच अजूनही काही कौशल्य आहेत ज्यामुळे हे एकमेकांपेक्षा वेगळे ठरत आहेत. आणि यांचे हेच वेगळेपण जजेस बरोबरच प्रेक्षकांना ही भावते आहे. आपल्या नावाला साजेशी, असेच वेगळेपण जपणारी जिज्ञासा... जिच्या नावातच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ती अगदी आपल्या नावाला साजेशी वागते. ९ वर्षांची ही चिमुरडी जजेस ना ही  कोड्यात पाडेल असे प्रश्न सतत विचारत असते.

अवघ्या ३ वर्षात नृत्याला सुरूवात करणारी मुंबईची जिज्ञासा भोई तिचे गुरू प्रशांत दळवीसोबत या स्पर्धेत सहभागी झाली आहे. ती मंचावर आली की आज जिज्ञासा कोणत्या गाण्यावर परफॉर्म करणार यापेक्षा आज जिज्ञासा मंचावर येऊन कोणते प्रश्न विचारणार आणि आपण त्याला काय उत्तर देणार याचा विचार जजेस करत असतात. जिज्ञासा मंचावर येताना तगडी प्रश्नावली घेऊन येते ज्याने जजेसच्याही नाकी नऊ येतात. त्यामुळे जिज्ञासाला आता ‘अनपेक्षित जिज्ञासा’ हे नाव आपसूक पडलंय आणि हे परीक्षकांना देखील पटलंय. प्रश्नांचा गुलदस्ता स्वत: जवळ बाळगणारी ही जिज्ञासा, नृत्याचा देव समजला जाणाऱ्या प्रभु देवा यांच्या आगामी ‘लक्ष्मी’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.मुंबईमध्ये जी एक स्पिरीट आहे, जी एक बिनधास्त भावना आहे, तशीच भावना आणि तिच एनर्जी मुंबईकर जिज्ञासामध्ये दिसून येते आणि त्यामुळेच बिनधास्त, बेधडकपणे प्रश्न विचारण्याचा जिज्ञासाचा स्वभाव आहे. मुंबईची जिज्ञासा आपल्या अनपेक्षित प्रश्नांनी जजेस् ना पेचात पाडते आहे तर आपल्या नृत्यकौशल्यांनी त्यांच्याकडून कौतुकाची थाप देखील मिळवत आहे. आता सुपर डान्सर महाराष्ट्र हा किताब मिळवण्यासाठी जिज्ञासा अजून जिद्दीने, मेहनतीने तिचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तिच्या या प्रयत्नातून तयार झालेले कमालीचे नृत्य सोनी मराठी वाहिनीवर सुपर डान्सर महाराष्ट्र पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :सुपर डान्सरसोनी मराठी