Join us

कामना पाठक बनली टेलिव्हिजनची सोनाक्षी सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 9:00 PM

अभिनेत्री कामना पाठक अॅण्ड टीव्हीच्या हप्पू असे सध्या नामकरण असलेल्या आगामी विनोदी मालिकेत चक्क नऊ वस्ताद मुलांच्या आईची भूमिका निभावण्यास सज्ज झाली आहे.

अभिनेत्री कामना पाठक अॅण्ड टीव्हीच्या हप्पू असे सध्या नामकरण असलेल्या आगामी विनोदी मालिकेत चक्क नऊ वस्ताद मुलांच्या आईची भूमिका निभावण्यास सज्ज झाली आहे. लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची इच्छा असणाऱ्या कामनाने प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत अनेक नाटकात काम केले आहे आणि आता ती छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कामना हप्पू या विनोदी मालिकेचा भाग बनवण्यास उत्सुक आहे. या मालिकेत योगेश त्रिपाठी हप्पू सिंगची आणि ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपूरी कटोरी अम्माची भूमिका साकारणार आहेत.

एक रंजक बाब म्हणजे कामना प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासारखी दिसते. योगायोग म्हणजे सोनाक्षीच्या पहिल्या सिनेमात म्हणजेच दबंगमध्ये तिचा जो लूक होता तसाच काहीसा लूक कामनाचा हप्पूमध्ये आहे. हप्पूमधील माझ्या राजेश या व्यक्तिरेखेतील प्रत्येक बाब मग ते कपडे असोत, केशभूषा असो की मेकअप… बऱ्याच गोष्टी दबंगमधील सोनाक्षी सिन्हाच्या लुकशी मिळत्याजुळत्या आहेत. राजेश एक बिनधास्त आणि स्पष्टवक्ती स्त्री आहे. सगळे काही मनासारखे व्हावे यासाठी ती नवऱ्याच्या संदर्भातील गोष्टी तशा घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. ती काहीशी खमकी बायको वाटत असली तरी तिच्याशी नीट वागले तर ती प्रेमळ आहे, असे कामना म्हणाली.

निर्मात्यांना बुंदेलखंडी उच्चारण असणारी अभिनेत्री हवी होती आणि कामना त्यासाठी अगदी योग्य आहे. त्यामुळे, ही भूमिका मिळणे, हे आपले नशीबच आहे, असे तिला वाटते. ती म्हणाली, मी मध्यप्रदेशची आहे. मी आणि आई एकमेकींशी बुंदेलखंडी लहेज्यातच बोलतो. त्यामुळे ही शैली माझ्यात अगदी स्वाभाविकपणे आहे. अर्थात, तिच्याशी बोलणे फार सोपे आहे पण हप्पूसाठी संवाद बोलताना ते काहीसे कठीण जात आहे. कारण, त्यात मला एक प्रकारचा रॉनेस आणायचा आहे. पण, इथेही आईचीच मदत झाली. उच्चारण सुधारून अगदी हवे तसे संवाद म्हणता येतील, यासाठी तिने मदत केली. मला वाटते टीव्हीवर बुंदेलखंडी भाषेचा फारसा वापर झालेला नाही. त्यामुळेही हे काम फार उत्साहजनक झाले आहे.अॅण्ड टीव्हीच्या या नव्या मालिकेचे नाव सध्या हप्पू असे ठेवण्यात आले आहे. यात पोलिस अधिकारी हप्पू सिंगची एक वेगळी बाजू आणि त्याला घरी प्रत्ययाला येणारी असंख्य प्रकारची द्विधा मनस्थिती दाखवण्यात येणार आहे. त्याच्या घरी धाडसी बायको, हट्टी आई आणि चक्क ९ मुले आहेत. आई आणि बायकोच्या भांडणात त्याचे सँडविच होते. बऱ्याचदा या दोघींचा राग त्याला सहन करावा लागतो आणि त्याचवेळी मुलांच्या सतत चालणाऱ्या खोड्यांनाही सामोरे जावे लागते.हप्पू ही मालिका लवकरच अॅण्ड टीव्हीवर दाखल होणार आहे.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हा