अभिनेत्री कंगना रणौतच्या(Kangana Ranaut) लॉक अप (Lock Upp) या ओटीटी रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक दररोज त्यांच्या हाय व्होल्टेज ड्रामामुळे चर्चेत येत आहेत. यात अलिकडेच या शोमध्ये सहभागी झालेली पायल रोहतगी (Payal Rohatgi) आल्यापासून चर्चेत येत आहे. यामध्येच आता तिच्यात आणि शिवम सिंहमध्ये (Shivam Singh) वादाची ठिणगी पडली असून शिवमने तिच्या प्रेग्नंसी कॉम्पिलकेशन्सवर कमेंट केली आहे.
ऑल्ट बालाजीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर लॉकअपचा एक प्रोमो शेअर केला आहे, या प्रोमोमध्ये अंजली, प्रिंस नरुला, शिवम आणि पायल यांच्यात शाब्दिक वाद सुरु असल्याचं पाहायला मिळतं. यात करणवीर बोहरासह पायल प्रेमाचं नाटक करण्यास तयार होती, असं अंजली शिवमला सांगते. त्याच्यावरुन या स्पर्धकांमध्ये भांडण होतं. अंजलीने केलेले आरोप खोटे असून पायल तिला बरं वाईट सुनावते. इतकंच नाही तर ती वाट्टेल तसं बोलते. त्यामुळे शिवमदेखील तिच्या प्रेग्नंसी कॉम्प्लिकेशन्सवरुन तिला ट्रोल करतो.
अंजली आणि पायलच्या वादाच प्रिंस उडी मारतो. ज्यामुळे संतापलेली पायल, तुम्ही सगळे मरुन जसं म्हणते. तिचं हे वाक्य ऐकल्यावर शिवमदेखील तिच्याशी भांडण करतो.
काय म्हणाला शिवम?
"ही अशी बाई. तिला इतकीही लाज वाटत नाही जी दुसऱ्यांच्या मुलांना दुषणं लावते. आम्ही देखील कोणाची तरी मुलं आहोत याचं तिला भान नाही," असं प्रिन्स म्हणतो. यावर त्याची री ओढत दुसऱ्यांच्या मुलांना तू वाईट बोलतेस, त्यांना शाप देतेस. मग, देव तरी तुला कशी काय मुलं देईल, असं शिवम बोलतो.
दरम्यान, शिवमच्या या वाक्यानंतर पायल प्रचंड दु:खी होते. परंतु, जसजसा या शोचा ग्रँड फिनाले जवळ येत आहे. तसंतसं या शोमधील स्पर्धक सातत्याने चर्चेत येण्याचा प्रयत्न करत आहेत.