कॉमेडीकिंग कपिल शर्माने गत बुधवारी गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर धूम करत असताना आता कपिलच्या गुरद्वारातील लग्नाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. होय, गुरुवारी सकाळी कपिलने पंजाबी पद्धतीने लग्न केले. या फोटोत कपिल पांढ-या रंगाच्या शेरवानीत आहे. सोबतचं डोक्यावर गुलाबी रंगाची पगडी घातली आहे. गिन्नीने गुलाबी रंगाचा लहंगा आणि त्यावर भरभक्कम दागिणे घातले आहेत.
जालंधर येथे कपिलचे हे लग्न पार पडले. पंजाबी गायक गुरदास मान यांनी स्पेशल परफॉर्मन्स देत या लग्नाला ‘चार चांद’ लावलेत.
यानंतर मुंबईतही एक रिसेप्शन होईल. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड व टीव्ही इंडस्ट्रीतील दिग्गज सहभागी होतील. याच महिन्यांत कपिलचा आपला नवा शो घेऊन येतोय. त्याचे चाहते त्याच्या या शोची आतूरतेने प्रतीक्षा करत आहेत.
गतवर्षी मार्चमध्ये ‘मिट माय वाईफ’अशी पोस्ट टाकून कपिलने गिन्नीसोबतचे रिलेशन जगजाहिर केले होते. यानंतर कपिल व सुनील ग्रोव्हर यांच्या भांडणाचा एक अंग गाजला होता. याचदरम्यान मध्यंतरी कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपची बातमीही आली होती. पण कालांतराने ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले होते. कॉलेजमध्ये असताना गिन्नीच्या नाटकांच्या प्रयोगांमध्येही तो तिची खूप मदत करायचा. गत वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, व्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून बाहेर पडला आहे.