Join us

कपिल शर्मा आणि नवजोत सिंह सिद्धू यांच्यातही झाला वाद,वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 8:58 AM

सुनील ग्रोव्हरचा कपिलसह झालेला वाद जगजाहीर आहे.या वादानंतर वेगवेगळ्या वादात कपिल अडकत गेला.'कपिल शर्मा' दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टींमुळे वादाच्या भोव-यात ...

सुनील ग्रोव्हरचा कपिलसह झालेला वाद जगजाहीर आहे.या वादानंतर वेगवेगळ्या वादात कपिल अडकत गेला.'कपिल शर्मा' दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टींमुळे वादाच्या भोव-यात अडकतोय.त्यामुळे शोवरही याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाला.'द कपिल शर्मा शो' आणखी वर्षभर तरी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या कार्यक्रमाचा सोनी वाहिनीसोबत असणारा करार या महिन्यात संपुष्टात आला होता. मात्र सोनी वाहिनीने या कार्यक्रमासोबत आणखी एक वर्षांचा करार केला आहे. सोनी वाहिनीने घेतलेल्या या निर्णयामुळे कपिल चांगलाच खूश असला तरी या शोचा आणखी एक सदस्य कपिलच्या एका निर्णयामुळे खूप संतापला आहे.आता हा सदस्य दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द नवजोत सिंह सिद्धू आहेत. त्याचे झाले असे की,गेल्या आठवड्यात नवजोत सिंह सिद्धू आजारी होते त्यामुळे त्यांना रविवारी शूटिंग करणे शक्य नव्हते.नवजोत सिंह सिध्दू शिवाय हा भागाचे शूटिंग होणार नव्हते.त्यामुळे कपिलने अर्चना पूरन सिंहला नवजोत सिंह सिध्दू यांच्या जागी जज करण्यासाठी बोलावले. ही गोष्ट नवजोत सिध्दू यांना समजताच त्यांनी नाराजी व्यक्त करत कपिलला खडे बोल सुनावले.ज्यावेळी कपिलला साथ देणारे कोणीही नव्हते तेव्हाही नवजोत सिध्दू कपिलच्या पाठीशी खंबीर उभे होते.एरव्ही जेव्हा जेव्हा नवजोत यांना शूटिंग करणे शक्य नव्हते तेव्हाही नवजोत सिध्दू यांच्या जागेवर त्यांचे भलेमोठे पोस्टर आणून ठेवले जायचे.मात्र यावेळी कपिलने असे न करता थेट नवजोत सिध्दू यांचा या शोमधून पत्ता कट करण्याचा प्लॅन केला होता का असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.यावेळी खुद्द कपिलनेच हा वाद ओढवून घेतल्यामुळे नवजोत सिध्दू कपिलवर नाराज असल्याचे समजतंय.