Join us
Daily Top 2Weekly Top 5

द कपिल शर्मा शोचा पहिला प्रोमो तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 09:46 IST

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा आता पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या प्रोमोत आपल्याला पहिल्या भागातले गेस्ट पाहायला मिळत आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये कोण येणार आहे हे कळल्यावर तर तुम्ही सगळेच खूप खूश होणार आहात.

ठळक मुद्देद कपिल शर्मा शो सिझन 2 च्या पहिल्या भागात बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान हजेरी लावणार आहे. त्याचसोबत त्याचे भाऊ सोहेल खान, अरबाज खान आणि वडील सलीम खानही या कार्यक्रमात दिसणार आहेत.याशिवाय या भागात प्रेक्षकांना रणवीर सिंग आणि सारा अली खान यांना देखील पाहायला मिळणार आहे. ते दोघे सिम्बा या त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत. 

कॉमेडी किंग कपिल शर्मा नुकताच गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नबंधनात अडकला. कपिलच्या आयुष्याचा हा नवा प्रवास आता सुरू झाला आहे. यासोबतच कपिलच्या आयुष्यात आणखी एक चांगली गोष्ट होणार आहे. त्याचा द कपिल शर्मा शो हा लवकरच पुनरागमन करणार आहे. द कपिल शर्मा शो प्रचंड गाजला होता. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यामुळे या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमात कोणकोणते कलाकार असणार तसेच कोणते सेलिब्रेटी या कार्यक्रमात हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाचा आता पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या प्रोमोत आपल्याला पहिल्या भागातले गेस्ट पाहायला मिळत आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये कोण येणार आहे हे कळल्यावर तर तुम्ही सगळेच खूप खूश होणार आहात. द कपिल शर्मा शो सिझन 2 च्या पहिल्या भागात बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान हजेरी लावणार आहे. त्याचसोबत त्याचे भाऊ सोहेल खान, अरबाज खान आणि वडील सलीम खानही या कार्यक्रमात दिसणार आहेत. याशिवाय या भागात प्रेक्षकांना रणवीर सिंग आणि सारा अली खान यांना देखील पाहायला मिळणार आहे. ते दोघे सिम्बा या त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत. 

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात अनेक नवे चेहरे देखील यंदाच्या सिझनमध्ये पाहायला मिळणार आहेत. भारती सिंग, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, सुदेश लहरी, रोशेल राव यांसारखे अनेक हास्यकलाकार या सिझनमध्ये झळकणार आहेत. हा कार्यक्रम सलमान खान प्रोड्युस करत असून सोनी वाहिनीवर हा शो प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.  

काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शोच्या सेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोवरून कपिल शर्माच्या घराचे नाव शर्मा बंधू सलाह केंद्र असे असणार असल्याचे कळत आहे. 

टॅग्स :कपिल शर्मा सलमान खानरणवीर सिंगसारा अली खान