रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल त्याच्या शोच्या माध्यमातून करत असतो. सगळ्यांना खळखळून हसवणारा कपिल एका वेगळ्याच गोष्टीमुळे त्रस्त आहे. ते म्हणजे त्याचे वाढते वजन. होय, काही वर्षापासून कपिलचे वजन सातत्याने वाढत आहे. वाढते वजन आटोक्यात येण्यासाठी तो खूप प्रयत्नही करत आहे. पण त्याला पाहिजे तसे यश मिळतच नाही. गेल्या 6 महिन्यापासून कपिल 2 किलो वजन कमी करू शकला नाही. या कारणामुळे तो सध्या खूप चिंतेत आहे. फॅट टू फिट होणे हे तर सा-यांचे स्वप्न असतेच.मात्र आपले वजन कमी करणे हा मोठा टास्कने सध्या कपिलची झोप सुद्धा उडवली आहे. वर्कआऊट आणि जीवनातील काही गोष्टी शिस्तीने फॉलो करण्याचे सल्ले आता त्याला त्याचे मित्र आणि चाहतेमंडळी देत असल्याचे पाहायला मिळतंय.
कॉमेडी किंग कपिल शर्माने गेल्या डिसेंबरमध्ये ‘द कपिल शर्मा शो’ द्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. त्यापूर्वी वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, मद्याचे व्यसन आदींमध्ये तो गुरफटला. यामुळे त्याचा शो बंद पडला. आता कपिल शर्माचे करिअर संपले असेच सगळ्यांना वाटले. पण कपिलला वेळीच जाग आली आणि तो या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडला.
काही दिवसांपूर्वीच पत्नी गिन्नीसोबत कॅनडाला व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेला होता. कपिलने इंस्टाग्राम अकाउंट गिन्नीसोबतच एक फोटो शेअर केला. या फोटोत दोघेही कॅनाडाच्या रस्त्यावर फेरफटका मारताना दिसले होते. कपिलच्या या फोटोला अवघ्याकाही तासांत 7 लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिले होते.
गिन्नी बऱ्याचदा 'द कपिल शर्मा' शोच्या सेटवर उपस्थित असते आणि तिथे कपिलची काळजीदेखील ती घेत असते. आता ती प्रेग्नेंट असल्यामुळे ती सेटवर येत असते. तिच्या कुटुंबियांना वाटते की, कपिलने जालंधरमध्ये गिन्नीसोबत राहावे. इतकेच नाही तर त्याच्या आईला देखील गिन्नीसोबत प्रेग्नेंसीच्या काळात रहायचे आहे.