‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) कधी नर्स तर कधी चिंगारी बनून प्रेक्षकांना हसवणारी अभिनेत्री रोशेल राव (Rochelle Rao) सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतेय. होय, रोशेलने पती किथसोबतचा बेडरूममधला व्हिडीओ शेअर केला अन् लोकांनी तिला ट्रोल करणं सुरू केलं.रोशेल सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. पतीसोबतचे अनेक बोल्ड फोटो ती सतत शेअर करत असते. पण बेडरूमधील एक प्रायव्हेट व्हिडीओ शेअर करणं रोशेलला चांगलंच महागात पडलं. (Rochelle Rao and keith sequeira Private Video)
व्हिडीओत रोशेल पतीसोबत बेडवर लेटलेली दिसतेय. किथ फोनवर काहीतरी बघतोय तर रोशेल लॅपटॉपवर काम करतेय. व्हिडीओच्या सुरूवातीला सगळं काही नॉर्मल दिसतं. पण अचानक सीन बदलतो. होय, किथ अचानक उठून रोशेलच्या माथ्यावर किस करतो आणि नंतर पोटाच्या भारावर पालथा होतो. त्याच्या पाठीवर ‘या वेळेचा वापर करा,’असं लिहिलेलं दिसतं. यानंतर रोशेल आपला हात कपाळावर ठेवते आणि त्यावर ‘कनेक्ट’ असं लिहिलेलं असतं.
बेडरूममध्येही फोन व लॅपटॉपमध्ये मग्न राहून कोणतंही कपल त्यांचे हेल्दी रिलेशनशिप पुढे नेऊ शकत नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न या व्हिडीओद्वारे केला गेला आहे. काहींना हा व्हिडीओ आणि त्याद्वारे दिलेला संदेश आवडला. पण काही लोकांनी यावरून लगेच रोशेल व किथला ट्रोल करायला सुरूवात केली.
रोशेल व किथ हे दोघे ‘बिग बॉस 9’मध्ये सहभागी झालं होतं. दोघंही त्यावेळी रिलेशनशिपमध्ये होते. शोमधून बाहेर येताच दोघांनी लग्न केलं होतं. रोशेल सध्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रेक्षकांना हसवताना दिसते. त्याआधी ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये दिसला होता.