Join us

Bigg Boss 14 : 'द कपिल शर्मा' शो फेम सुगंधा मिश्रा जाणार बिग बॉसच्या घरात?, कॉमेडियनने सोडले मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 16:05 IST

टीव्ही इंडस्ट्रीचा सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस' च्या 14 व्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

टीव्ही इंडस्ट्रीचा सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस' च्या 14 व्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील बिग बॉसच्या घरात कोण-कोण जाणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सीझनमधील काही नाव समोरदेखील आली आहेत. कॉमेडियन सुगंधा मिश्रा या शोचा हिस्सा बनणार अशी चर्चा आहे. 

बिग बॉसच्या घरात सुगंधा मिश्रा जाणार ?

कपिल शर्मा शोमध्ये आपल्या कॉमेडीची जादू पसरवणारी सुगंधा मिश्रा बिग बॉस 14 चा भाग बनू शकते अशी माहिती आहे. बिग बॉस 14 मध्ये सहभागी होण्यासाठी सुगंधानला अप्रोच करण्यात आल्याच्या वृत्ताला तिने दुजोरा दिला आहे. एका मुलाखती दरम्यान सुगंधा म्हणाली, होय, मला बिग बॉस 14 ची ऑफर मिळाली. मी आत्ता एवढेच सांगतो की शो ऑनएअर गेल्यावर मी या शोचा हिस्सा आहे हे तुम्हाला कळेल. आता मी यावर मी कमेंट करु शकत नाही. 

सुगंधा मिश्रा टीव्हीवरील अनेक कॉमेडी शोजमध्ये दिसली आहे. सुगंधा तिच्यामिमिक्रीसाठी प्रसिद्ध आहे.  ती एक चांगली गायिकाही आहे.सलमान खानच्या शोमध्ये  कॉमेडियन सुगंधाला पाहण्यासाठी तिटे चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :बिग बॉस