ओ भाई जी, गजब की स्पीड से लगे हो...! दुसऱ्यांदा बाप होताच कपिल शर्मा झाला ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 11:28 AM2021-02-01T11:28:10+5:302021-02-01T11:36:02+5:30
कॉमेडियन कपिल शर्मा दुसऱ्यांदा बाप झाला. कपिलची पत्नी गिन्नीने आज पहाटे एका गोंडस मुलाला जन्म दिला.
कॉमेडियन कपिल शर्मा दुसऱ्यांदा बाप झाला. कपिलची पत्नी गिन्नीने आज पहाटे एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. कपिलने लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली. यानंतर असंख्य चाहत्यांनी कपिल शर्मावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला. अर्थात काहींनी ट्रोल करणेही सुरु केले. दुस-या मुलाची इतकी घाई काय होती? असे एक ना अनेक प्रश्न विचारून ट्रोलर्सने कपिलला ट्रोल केले.
Namaskaar 🙏 we are blessed with a Baby boy this early morning, by the grace of God Baby n Mother both r fine, thank you so much for all the love, blessings n prayers 🙏 love you all ❤️ginni n kapil 🤗 #gratitude 🙏
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) February 1, 2021
ही म्हणजे खूपच घाई झाली. गेल्याच वर्षी तुझ्या पत्नीने मुलीला जन्म दिला, असे एकाने लिहिले. मुलांच्या जन्मात अंतर का नाही? हे अजिबात योग्य नाही, असे एका युजरने त्याला सुनावले. एका युजरने तर यावरून कपिलची चांगलीच खिल्ली उडवली. ‘ओ भाई जी, गजब की स्पीड से लगे हो. एक के बाद एक प्रॉडक्शन सुरु है, बिना रूके,’ असे त्याने लिहिले.
पहाटे ५.३० वाजता कपिल शर्माने ट्विट करत मुलगा झाल्याची माहिती माहिती दिली. ‘नमस्कार, आज सकाळी आम्हाला देवाच्या आशीवार्दाच्या रुपात मुलगा आला आहे. ईश्वराच्या कृपेने बाळ आणि आई दोघंही चांगले आहेत. तुमचं प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभार. गिन्नी आणि कपिल,’ असे ट्विट त्याने केले.
कपिल आणि गिन्नीने दुसºया प्रेग्नंसीची माहिती बराच काळ लपवून ठेवली होती. यादरम्यान नोव्हेंबर 2020 मध्ये गिन्नीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती प्रेग्नंट दिसत होती.
कपिल आणि गिन्नी डिसेंबर 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. यानंतर जुलै महिन्यात गिन्नी पहिल्यांदा गर्भवती असल्याची माहिती समोर आली होती ज्याला कपिलने दुजोरा दिला होता. 10 डिसेंबर 2019 रोजी गिन्नीने मुलीला जन्म दिला. गत १० डिसेंबरला ती एक वर्षांची झाली असून आता कुटुंबात नवा पाहुणा आला आहे.