कॉमेडियन कपिल शर्माला ‘द कपिल शर्मा शो’ने पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळून दिली. कपिल शर्माचे खरे नाव शमशेर सिंह आहे.आज त्याचा ४०वा वाढदिवस आहे.सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कपिल त्याच्या मेहनतीने आज सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटींच्या यादीत सामिल झाला आहे.
रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल या शोच्या माध्यमातून करतो. अख्या जगाला हसवणारा कपिलला इथपर्यंत पोहचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. अत्यंत हलाखीचे आयुष्य कपिलच्या वाट्याला आले .कमी वयात त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली.त्यामुळं दुपट्टा विकण्याचेही काम कपिलने केले आहे. तर चार वर्ष त्याने फोन ऑपरेटर म्हणूनही नोकरी केली.
कपिल मुळचा अमृतसरचा आहे. कपिलने दहा वर्षे रंगभूमीवर काम केले आहे. त्याच्या घरची आर्थिक स्थिती जेमतेम होती. 2006 हे वर्ष कपिलच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. या वर्षात कपिलने ‘हंस दे हंसा दे’ या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला पण संघर्ष सुरुच होता.
2007 साली कपिल ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोच्या तिस-या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला. यानंतर कपिलने अनेक शो केले़ अनेक अवार्ड शो होस्ट केलेत. पण हार मानली नाही. 2010-2013 या काळात ‘कॉमेडी सर्कस’ या शोमध्ये तो झळकला. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर लोक कपिलला ओळखू लागले होते.
कपिलने जेव्हा इंडस्ट्रीत येण्यासाठी संघर्ष सुरू केला तेव्हा स्वतःच्या मेहनतीवर त्याने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यालाही कोणी गॉडफादर मिळाला नाही. शून्यापासून सुरू केलेला कपिलचा प्रवास आज यश शिखरावर येऊन पोहचला आहे.
कपिल शर्मा शोच्या पहिल्या सीजनमध्ये वीकेंड एपिसोडसाठी 60 ते 70 लाख लाखांचे मानधन घ्यायचा. पण आता तो प्रत्येक वीकेंडच्या एपिसोडसाठी एक कोटी रुपये घेतो. वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याने मानधनात 30 टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. आज कपिल कोट्यवधींचा मालक बनला आहे.