Kapil Sharma : कपिल शर्माची पोलखोल, 'टेलिप्रॉम्पटर वाचून...'; युझरने व्हिडिओ शेअर करत केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 12:43 PM2023-01-02T12:43:18+5:302023-01-02T12:43:33+5:30

कोणताही सिनेमा असो त्याचे प्रमोशन कपिल शर्माच्या शो मध्ये झालेच पाहिजे असा हट्ट असतो. तर आता कपिलची एका युझरने पोलखोल केली आहे ज्यामुळे तो चांगलाच ट्रोल होतोय.

kapil-sharma-uses-teleprompter-while-live-doing-show-a-user-shared-video-of-it | Kapil Sharma : कपिल शर्माची पोलखोल, 'टेलिप्रॉम्पटर वाचून...'; युझरने व्हिडिओ शेअर करत केला दावा

Kapil Sharma : कपिल शर्माची पोलखोल, 'टेलिप्रॉम्पटर वाचून...'; युझरने व्हिडिओ शेअर करत केला दावा

googlenewsNext

Kapil Sharma : घराघरात हमखास पाहिला जाणारा शो म्हणजे 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा' (Comedy Nights With Kapil Sharma). कपिल शर्माचे विनोद, त्याचे सेन्स ऑफ ह्युमर यावर प्रेक्षक खळखळून हसतात. अगदी बाहेरच्या देशातूनही लोक हा शो बघायला येतात. कोणताही सिनेमा असो त्याचे प्रमोशन कपिल शर्माच्या शो मध्ये झालेच पाहिजे असा हट्ट असतो. पण आता कपिलची एका युझरने पोलखोल केली आहे ज्यामुळे तो चांगलाच ट्रोल होतोय.

टेलिप्रॉम्पटरवर पाहून वाचतो जोक्स

कपिल शर्मा गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या विनोदांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय.तो जेव्हा बोलतो, विनोद करतो तेव्हा ते खूपच नॅचरल वाटते. पण आता एका युझरने असा दावा केला आहे की कपिल शर्मा टेलिप्रॉम्पटरवर बघून जोक्स वाचतो. क्लोक ऑफ इनव्हिजिबिलिटी clokofinvisivili.t या इन्स्टाग्राम हॅंडल वरुन एका युझरने व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात टेलिप्रॉम्पटरचे रिफ्लेक्शन कपिलच्या मागे असलेल्या काचेच्या खिडकीवर दिसून येते. 

या व्हिडिओवर तुफान कमेंट्स सुरु झाल्या आहेत. काही जणांनी कपिलला ट्रोल केले आहे तर काही युझर्स त्याला पाठिंबाही देत आहेत. ही एक आवश्यक प्रक्रिया आहे, लाईव्ह परफॉर्मन्स करताना चूक होऊ नये म्हणून खबरदारीसाठी याचा वापर होतो अशी कमेंट एकाने केली आहे. भाऊ, ही तर फक्त कॉमेडी आहे इथे तर आपले पंतप्रधानही टेलिप्रॉम्पटरचा वापर करतात, अशी कमेंट एकाने केली आहे.

Web Title: kapil-sharma-uses-teleprompter-while-live-doing-show-a-user-shared-video-of-it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.