Join us

बाबो! Kapil Sharma च्या व्हॅनिटी व्हॅनची किंमती इतकी की त्यात घेऊ शकाल लक्झरी बंगला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 18:54 IST

Kapil Sharma Vanity Van : कपिल शर्माकडे महागड्या गाड्यांसोबतच कोट्यावधी रूपयांची प्रॉपर्टीही आहे. इतकंच नाही तर कपिलकडे त्याची स्वत:ची व्हॅनिटी व्हॅनही आहे.

Kapil Sharma Vanity Van Cost: कॉमेडी किंग म्हणून ओळख असणारा प्रसिद्ध कॉमेडिअन कपिल शर्मा (Kapil Sharma) गेल्या काही वर्षांपासून लोकांच्या मनात घर करून आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, कपिलची दर महिन्याची कमाई कोट्यावधी रूपये आहे. अशात तो लक्झरी लाइफ जगणारच. त्याच्याकडे महागड्या गाड्यांसोबतच कोट्यावधी रूपयांची प्रॉपर्टीही आहे. इतकंच नाही तर कपिलकडे त्याची स्वत:ची व्हॅनिटी व्हॅनही आहे.

कोट्यावधी लोकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या कपिल शर्माकडे त्याची स्वत:ची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहे. जी फाइव्ह स्टार हॉटेलच्या रूमपेक्षा जराही कमी नाही. ही व्हॅनिटी कपिलच्या सर्व सुविधा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. जसे की, कपिलच्या व्हॅनिटीमध्ये मोठा स्क्रीन असलेला टीव्ही आणि आरामदायक बेड आहे. त्यासोबतच तिथे त्याचं एक ड्रेसिंग एरियाही आहे. कपिलची ही व्हॅनिटी व्हॅन दिलीप छाबडियाने डिझाइन केली आहे.

कपिल शर्माची व्हॅनिटी व्हॅन डिझाइन करणाऱ्या दिलीप छाबडियाने शाहरूख खानची व्हॅनिटी व्हॅनही डिझाइन केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिलच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत ५.५ कोटी रूपये आहे. इतक्या किंमतीत तर कुणीही आपल्यासाठी लक्झरी घर खरेदी करू शकेल. तसे बॉलिवूडमध्ये असे मोजकेच स्टार आहेत ज्यांच्याकडे स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन आहे आणि त्यातील एक नाव आहे कपिल शर्मा. यावरून हे लक्षात येतं की कपिल एक शाही आयुष्य जगतो. यासोबतच कपिलकडे अनेक लक्झरी कार्सही आहेत. 

टॅग्स :कपिल शर्मा टेलिव्हिजनबॉलिवूड