Kapil Sharma's Birthday : कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) आज २ एप्रिलला आपला वाढदिवस साजरा करत आहे. १९८१ मध्ये कपिल शर्मा पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्माला आला होता. त्याच्या वडिलांचं निधन बालपणीच झालं होतं. अशात त्याच्या आईनेच त्याच संगोपन केलं. कपिल सध्या त्याचा शो 'द कपिल शर्मा शो'मुळे नेहमी चर्चेत असतो. या शोच्या माध्यमातून कपिल प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. कपिलने त्याची लॉंग टाइम गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत (Ginni Chatrath) लग्न केलं. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
कपिल शर्मा आणि गिन्नी यांच्या लव्हस्टोरीची चांगलीच चर्चा झाली होती. कपिल आणि गिन्नीची लव्हस्टोरीही एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणे आहे. अनेकांना माहीत नाही की, कपिल आणि गिन्नी १३ वर्ष एकमेकांना डेट करत होते. ज्यानंतर १२ डिसेंबर २०१८ मध्ये दोघांनी परिवाराच्या सहमतीने लग्न केलं.
ब्रेकअप झालं होतं
कपिल शर्माच्या लव्हस्टोरीमध्ये एक मजेदार ट्विस्ट आला होता. कपिलला गिन्नीला मिळवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. रिपोर्टनुसार, कपिल जेव्हा गिन्नीच्या प्रेमात पडला होता तेव्हा त्याची आई लग्नाची बोलणी करण्यासाठी गिन्नीच्या घरी गेली होती. पण तेव्हा गिन्नीच्या वडिलांनी लग्नास नकार दिला होता. यानंतर कपिलने गिन्नीसोबतचं नातं तोडलं होतं. कपिलने गिन्नीला मिळवण्याची आशा सोडली होती.
कुठे झाली होती भेट
एका मुलाखतीत कपिलने सांगितलं होतं की, 'मी एचएमवी कॉलेज जालंधरमध्ये शिकत होतो. मला स्कॉलरशिप होती आणि थिएटरमध्ये नॅशनल विनर होतो. २००५ ममध्ये जेव्हा मी आयपीजे कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा पॉकेट मनीसाठी एकांकिकांचं दिग्दर्शन करत होतो. विद्यार्थ्यांचं ऑडिशन घेण्यासाठी गिन्नीच्या कॉलेजमध्ये गेलो होतो. गिन्नीही ऑडिशनसाठी आली होती. हीच आमची पहिली भेट होती.
कपिलने सांगितलं होतं की, 'जेव्हा त्याला समजलं की गिन्नीही त्याला पसंत करते तेव्हा तो गिन्नीला म्हणाला होता की तू ज्या कारने येते ती माझ्या फॅमिली इन्कमपेक्षाही जास्त किंमतीची आहे. त्यामुळे आपल्यात काही होऊ शकत नाही'. तो असंही म्हणाला होता की, 'गिन्नी त्याची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा तो स्टार नव्हता तेव्हा गिन्नीने त्याला साथ दिली. इतकंच काय जेव्हा शो बंद करावा लागला होता तेव्हा तो आजारी पडला होता. तेव्हा गिन्नी त्याच्यासोबत होती.