Join us

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीला मिळत नाही काम,लोकांना कॉल करून मागते काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 10:20 AM

सुमोनाने खरंतर 'मन' या सिनेमापासून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती या सिनेमात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती.

सुमोना चक्रवर्ती कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. सध्या ती द कपिल शर्मा या कार्यक्रमात देखील कपिल शर्मासोबत महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे. कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी या भूमिकेमुळेच सुमोना ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली. या कार्यक्रमामुळे तिला घराघरात ओळख मिळाली.  टीव्ही इंडस्ट्रीत सुमोनाने आपल्या अभिनयाचे आपले स्थान निर्माण केले आहे.मात्र असे असूनही सुमोनाकडे कपिलच्या शोव्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम नाही. साचेबद्ध पठडीचे काम न करता आता तिला दुसरे काही तरी वेगळे काम करण्याचे वेध लागले आहेत.

लोकप्रिय असूनही सुमोनाला दुस-या कामाच्या संधीच मिळत नाही. स्वतःला ती निर्मात्यांना फोन करून काम मागण्याची वेळ तिच्यावर आली आहे. दिलेल्या एका मुलाखतीत तिने म्हटले आहे की, तिच्याविषयी इंडस्ट्रीत नकळत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. ज्यामुळे तिला चिंता लागली आहे. ती म्हणाली, "लोकांना वाटते की मी विक्षिप्त आहे आणि अधिक मानधनाची मागणी करते. पण हे खरे नाही. मी प्रत्येकाला सांगू इच्छिते की, मी अभिनेत्री म्हणून तेच मागते, ज्यासाठी मी पात्र आहे. आत्तापर्यंत कामाच्या बळावर स्वतःला सिद्ध करण्यावर मला  विश्वास होता. मात्र इंडस्ट्रीत काम हेच सर्वकाही नसून स्वतःला स्वतःची मार्केटींग करावी लागते हेच या चंदेरी दुनियेचं कटू सत्य असल्याचे तिने म्हटले आहे.  दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे अभिनेत्री म्हणून आपली कारकीर्द चालू ठेवायची असेल तर आपली उपस्थिती टिकवून ठेवणे फार महत्वाचे आहे."

सुमोनाने खरंतर 'मन' या  सिनेमापासून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती या सिनेमात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने अभिनयातून काही वर्षांचा ब्रेक घेतला आणि तिने 'बर्फी', 'किक', 'फिर से' यांसारख्या अनेक सिनेमामध्ये काम केले. 'कसम से', 'बडे अच्छे लगते है', 'जमाई राजा' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली आहे. 

टॅग्स :सुमोना चक्रवर्तीकपिल शर्मा