Join us

करण जोहर म्हणतो 'हे' गाणं माझ्या मनाच्या सगळ्यात जवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 12:54 PM

'डान्स दिवाने' शोच्या परीक्षकांची जबाबदारी माधुरी दीक्षित नेने, शशांक खेतान आणि तुषार कालिया संभाळतायेत. 

कलर्सचा नवीन रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने'ला  प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. हा शो वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामध्ये संपूर्ण भारतातील 3 पिढ्यातील लोक स्पर्धक म्हणून येणार आहेत आणि डान्स सादर करणार आहेत. या शोच्या परीक्षकांची जबाबदारी माधुरी दीक्षित नेने, शशांक खेतान आणि तुषार कालिया संभाळतायेत. 

आगामी एपिसोडमध्ये शकील शेखची दिमाखदार कामगिरी पहायला मिळणार आहे, तो ऐ दिल है मुश्किलवर डान्स करणार आहे आणि तो तुषार आणि करण जोहर साठी अतिशय विशेष आहे कारण तो त्यांचा टर्निंग पॉइंट आहे. तुषार कालियाने सांगितले, “मी करण सरांचा अतिशय आभारी आहे, ऐ दिल है मुश्किल सारख्या सिनेमाचे कोरियाग्राफी करण्याची मला संधी देण्यासाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. तो सिनेमा माझ्यासाठी अतिशय विशेष आहे आणि त्यांचा माझ्यावरील विश्वास आणि श्रध्दा यामुळे मला चांगले काम करता आले.”

करण जोहर म्हणाला, “माझी दोन गाणी अतिशय विशेष आहेत आणि त्यातील एक आहे 'कल हो ना हो'चे शिर्षक गीत आणि ऐ दिल है मुश्किल. तुषारच्या कोरियोग्राफीने ती गाणी माझ्यासाठी अजूनच विशेष बनवली आहेत.” त्यानंतर तुषार आणि इशानने त्या गाण्यांवर डान्स सादर केला आणि त्यांच्या चालींनी सर्वजण आश्चर्यचकित झाले.