टीव्ही अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) हे सर्वात क्युट कपल म्हणून ओळखलं जातं. बिग बॉसपासून त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. करण आणि तेजस्वी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्यांचे अनेक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण आता या क्युट कपलमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत. तसंच करणच्या आयुष्यात १८ वर्ष लहान अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचीही चर्चा आहे.
रेडिट युजरने पोस्ट शेअर करत करण आणि तेजस्वीचं ब्रेकअप झाल्याचा दावा केला आहे. यामागे कारण आहे ते म्हणजे करण आणि २१ वर्षीय टीव्ही अभिनेत्री रीम शेख यांच्या जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. यामुळेच तेजस्वी करणवर नाराज असून त्यांच्यात दुरावा आला आहे. सध्या करण कुंद्रा 'तेरे इश्क मे घायल' मालिकेत भूमिका साकारत आहे. तर रीम शेख त्याची हिरोईन आहे. अशात दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशा अफवा पसरल्या आहेत. रीमने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम स्टोरीवर एकतर्फी प्रेमावर पोस्ट केली होती.
आणखी एका युजरने सांगितले की 'लाफ्टर शेफ' शूटिंगच्या आधी दोघांमध्ये सगळं काही ठीक होतं. पण अचानक सगळं बदललं. इतकंच नाही तर सध्या दोघंही एकमेकांच्या पोस्टला लाीकही करत नाहीत. अनेक युझर्सने रीम आणि करण कुंद्राच्या व्हिडिओमध्ये तेजस्वीला टॅग केलं. यामुळे आता तेजस्वी आणि करणमध्ये नक्की काय चाललंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रीम शेख आणि करण कुंद्रा यांच्यात 18 वर्षांचं अंतर आहे. करण ३९ वर्षांचा असून रीम शेख फक्त २१ वर्षांची आहे. तर तेजस्वीचं वय ३० आहे. तसंच करण कुंद्राचे याआधी अनेक अफेअर्स झाले आहेत. त्यामुळे तो ट्रोल होण्याचीही शक्यता आहे.