करण मेहरा आणि निशा रावल दोघेही इंटस्ट्रीमधले रोमँटीक कपल म्हणून ओळखले जायचे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याने दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला होता. निशा रावलने करण विरोधात घरगुती हिंसाचाराबद्दल पोलिसांत तक्रार दिल्यानंतर एक रात्र करणला जेलची हवाही खावी लागली होती. या दोघांचा वाद जगासमोर आल्यानंतर दिवसेंदिवस वादाचे वेगवेगळे कारणं आता समोर येत आहेत. करण मेहरानंतर आता निशा रावलने तिच्या सासरच्या लोकांविरोधातही तक्रार दाखल केली आहे.
निशा विरोधात सासच्या लोकांनीच करणला भडकावल्याचा धक्कादायक आरोप तिने केला आहे. सासु सासरे अजय मेहरा आणि बेला मेहरा, दिर कुणाल मेहरा या तिन लोकांची नावाची निशाने तक्रार दाखल केली आहे. या लोकांनीच करणला भडकवले आणि त्यामुळे करणने तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केल्याची निशाने म्हटले आहे. इतकेच नाही तर करणने निशाच्या बँक खात्यातून १ करोड रुही काढल्याचा आरोप तिने केला आहे. करण मेहरासोबतच आता सासरच्या लोकांचाही पोलिस चौकशी करत आहेत. अद्याप तरी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे.
करणवर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा नीशाने केला होता.करण मेहराचे बाहेर अफेअर सुरु असल्याचे तिचे म्हणणे आहे. करण मेहराच्या फोनवर काही तिच्या नजरेत पडल्यानंतर करणवर तिचा विश्वास उडाला होता. पण नाते टिकवून ठेवण्यााठी कुटुंब आणि मित्र मंडळींपासून तिने सर्व गोष्टी लपवल्याचे म्हटले होते. पण काही गोष्टी वाढत गेल्या आणि दोघांमधला वादही वाढत गेल्याने लग्न टिकणार नाही हे लक्षात आल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचं निशाने सांगितले होते.
घटस्फोटानंतरच्या पोटगी बाबबत त्यांच्यात चर्चा सुरू होती.निशाने पोटगीसाठी मोठी रक्कम मागितली इतकी मोठी रक्कम देणे करणला शक्य नसल्याचे त्याने म्हटले होते.तसेच निशाला बायपोलर डिसऑर्डचा आजार असल्याने तिचं वागणे तिला कळत नाही. इतरही वेळी ती घरात माझ्यासोबत हिंसक झाल्याचे करणने म्हटले होते.