'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम करण मेहरा आणि पत्नी निशा रावल यांच्यात सोमवारी रात्री मोठा वाद झाला आणि घरगुती भांडण थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहचलं. याआधीही त्यांच्यात वादविवाद झाले होते. परंतु दोघांनी त्यावर बोलणं टाळलं होतं. परंतु आता निशा रावलने समोर येऊन करण मेहरावर गंभीर आरोप केले आहेत. यासाठी निशाने पत्रकार परिषदही घेतली.
निशा रावलने मीडियासमोर करणबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यात तिने म्हटले आहे की, ५ महिन्याची प्रेग्नंट असतानाही करण तिला मारहाण करत होता. गेल्या अनेक वर्षापासून दोघांचे नाते सुरुळीत नव्हते. २०१४ साली करणने तिला मारहणा केली होती. तेव्हा निशा ५ महिन्यांची प्रेग्नंट होती. याच कारणामुळे निशाला तिचे मुलही गमवावे लागले.
गर्भपात झाल्यानंतरही करण तिला सतता त्रास देत राहिला. या सगळ्या काळात आपण भेदरल्याचे तसंच खचून गेल्याचंही निशाने नमूद केले आहे. या कठीण समयी आणि आव्हानात्मक परिस्थितीत नाते टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिली. करणवर माझे खूप प्रेम होते त्याच्यापासून दूर राहणे शक्य नव्हते म्हणूनच मानसिक आणि शारिरिक छळ सहन करत राहिली. या कपलला कविश नावाचा एक मुलगा आहे.
दरम्यान करणने देखील त्याची बाजु मांडली आहे. त्याने म्हटले आहे की, निशा ही बायपोलर आजाराने पिडीत आहे. यामुळे तिलाच कळत नाही की ती कधी काय करते. खूप चिडचिड करते. जोरजोराने भांडते. गेल्या अनेकवर्षापासून या आजाराने निशा त्रस्त असल्याचे त्याने म्हटले आहे. एकदा असेच करण त्याच्या आईसह फोनवर बोलत होता. निशाने घरात येताच जोरजोराने ओरडायला सुरुवात केली. त्यावेळी करणच्या आईनेही निशाचा भांडणाचा आवाज ऐकला. निशाचा स्वभावच तसा आहे. बायपोलर डिसऑर्डर या आजारामुळे ती कधी कधी हिंसकही होत असेही करणने सांगितले.
तसेच मागील एक महिन्यापासून आमच्यात वाद सुरू होता. कारण अनेक दिवसांपासून आमच्या दोघांच्या नात्यात काहीही ठीक चाललं नव्हतं. तेव्हा आम्ही विचार केला दोघांनीही वेगळं व्हायचं अथवा काही तरी करायचं. त्यासाठी आम्ही आमच्यातील काही गोष्टी ठीक करण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्यातील वाद सोडवण्यासाठी निशाचा भाऊ रोहित सेठियाही आला होता असं त्याने सांगितले. त्यानंतर निशा आणि तिच्या भावाने घटस्फोटासाठी जी रक्कम मागितली तेवढी रक्कम देणं शक्य नव्हतं.
इतके पैसे मला देता येणार नाही त्यावरून आमच्यात वाद सुरू होता. रात्री १० वाजता ते दोघंही माझ्या जवळ आले. तेव्हाही ते याच विषयावर बोलत होते. मी स्पष्टपणे सांगितले इतकी रक्कम देऊ शकत नाही. तुम्हाला जे काही कायदेशीर करायचं आहे करा मीदेखील कायद्याने उत्तर देतो असं करण मेहराने सांगितले.