Join us

हे खरंय की, मी बायपोलर डिसऑर्डर आजाराने पिडीत आहे, पण सायको नाही निशा रावलचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 2:07 PM

करण मेहराने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत नैतिक बनत रसिकांचे तुफान मनोरंजन केले.ही मालिका सोडल्यानंतर करण बिग बॉसच्या 10व्या पर्वातही कंटेस्टंट म्हणून झळकला होता.

टीव्ही अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल यांनी सहा वर्षे डेटिंग केल्यानतंर नोव्हेंबर 2012 मध्ये लग्न केले होते. करणने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत नैतिक बनत रसिकांचे तुफान मनोरंजन केले.ही मालिका सोडल्यानंतर करण बिग बॉसच्या 10व्या पर्वातही कंटेस्टंट म्हणून झळकला होता. त्यानंतर करण 'खटमले इश्क' या मालिकेत झळकला. तर निशासुध्दा टीव्ही अभिनेत्री आहे. निशाने 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की' , 'आने वाला पल' , 'केसर' या मालिकांमध्ये झळकली होती. करण आणि निशा रिएलिटी शो 'नच बलिए' मध्ये एकत्र झळकले होते. या कपलला एक मुलगा असून त्याचे नाव कविश असे आहे.

सोशल मीडियावर दोघेही सतत एकमेकांसह रोमँटीक फोटो शेअर करताना दिसायचे. त्यांच्यामध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे फोटोंवरुन जाणवायचे. या कपलमध्ये कधीही कुठल्याही प्रकारचे वाद होतील असे कधीच वाटले नव्हते. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांनाही या दोघांचा वाद कळल्यावर जबर धक्का बसला आहे. विशेष म्हणजे करण मेहरा हा अतिशय शांत स्वभावाचा असून तितकाच मनमौजी आहे. सतत तो पत्नी निशाचे कौतुक करताना दिसायचा. मात्र या कपलच्या आयुष्यात आलेल्या वादळामुळे दोघेही चर्तेत आहेत.

करण मेहराने त्याची बाजु मांडताना सांगितल होते की, निशा ही बायपोलर डिसऑर्डर आजाराने पिडीत आहे. यामुळे तिलाच कळत नाही की, ती कधी काय करते. खूप चिडचिड करते. जोरजोराने भांडते. गेल्या अनेक वर्षापासून या आजाराने निशा त्रस्त असल्याचे त्याने म्हटले आहे. एकदा असेच करण त्याच्या आईसह फोनवर बोलत होता. निशाने घरात येताच जोरजोराने ओरडायला सुरुवात केली. त्यावेळी करणच्या आईनेही निशाचा भांडणाचा आवाज ऐकला. निशाचा स्वभावच मुळात रागीट आहे. बायपोलर डिसऑर्डर या आजारामुळे ती कधी कधी हिंसकही होते असेही करणने सांगितले.

यावर निशाने देखील ती बायपोलर डिसऑर्डरची पिडीत असल्याचे मान्य केले आहे. हा मानसिक आजार आहे. यामुळे अनेकदा मुड स्विंग होतात. या आजारामुळे कधीच माझ्या खासगी आयुष्यावर याचा परिणाम झाला नाही. हा आजार कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे उगाच आजाराचे कारण दाखवून मला कोणालाही काहीही सिद्ध करायची गरज वाटत नाही. हा आजार व्हायला करणच जबाबदार आहे. 

२०१४ साली माझे पहिले बाळ मी गमावले. कठिण परिस्थितीतही करणने माझी साथ दिली नाही. याउलट तो माझ्याशी अतिशय वाईट पद्धतीने वागायचा. तेव्हाच करणचे खरे रुप माझ्या समोर आले होते. त्याची अशी अवस्था बघून मला अस्वस्थ व्हायला व्हायचे. मी काही वर्ष मानसोपचा तज्ञांकडे उपचार सुरु केले. ही गोष्ट देखील करणला आवडत नव्हती. इतकंच काय तर त्याने माझं घरातून बाहेर पडणंही बंद केलं होतं. करणचे अशा प्रकारे वागणे बघून मी स्वतःच शॉक्ड होते.