Join us

किचन चॅम्पियन कार्यक्रमात होणार अली गोनीचे स्वयंवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 7:00 PM

किचन चॅम्पियन या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात अली गोनीसाठी करण चांगली पत्नी शोधण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

ठळक मुद्देएवढेच नव्हे तर आपल्या लाडक्या मित्राचे तो स्वयंवर करणार आहे. या स्वयंवरासाठी करण पटेल तीन मुलींना स्टेजवर बोलावणार आहे आणि त्यांना अली आणि त्याच्या आईवर आपली छाप पाडण्याची संधी देणार आहे.

कलर्सच्या नुकत्याच सुरू झालेल्या किचन चॅम्पियनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मनोरंजनाचा खजिना असलेल्या या कार्यक्रमात तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ पाहायला मिळत असतात. येत्या काही भागांमध्ये आपल्याला टेलिव्हिजनवरील दोन चांगले मित्र करण पटेल आणि अली गोनी यांना पाहायला मिळणार आहे. करण पटेल आणि अलीने ये है मोहोब्बते या मालिकेत एकत्र काम केले होते. आता त्या दोघांचे पाकशास्त्रातील ज्ञान (की अज्ञान) हे आपल्याला किचन मध्ये पाहायला मिळणार आहे. या चॅलेंज मध्ये त्यांना मदत करण्यासाठी  करणची पत्नी अंकिता आणि ॲली गोनीची आई सुद्धा सहभागी होणार आहेत.

आपल्या सूत्रसंचालनाने सगळ्यांचे मनोरंजन करणारा सूत्रसंचालक अर्जुन बिजलानी देखील अली आणि करणच्या या स्पर्धेत रंगत आणणार आहे. यावेळी तो करण पटेलला काही अनोख्या डिशेस बनवायला सांगणार आहे. यामुळे अली गोनी आणि त्याची दोस्ती मजबूत होणार आहे आणि या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात अली गोनीसाठी करण चांगली पत्नी शोधण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  एवढेच नव्हे तर आपल्या लाडक्या मित्राचे तो स्वयंवर करणार आहे. या स्वयंवरासाठी करण पटेल तीन मुलींना स्टेजवर बोलावणार आहे आणि त्यांना अली आणि त्याच्या आईवर आपली छाप पाडण्याची संधी देणार आहे. या मुली देखील आपआपल्या परीने खूप प्रयत्न करणार आहेत. याकरता ते गायन, नृत्य आणि काव्यवाचन यांसारख्या आपल्या कलांचेही प्रदर्शन करणार आहेत. करणने ही मस्ती केल्यानंतर आता काय करायचे हेच अलीला कळणार नाहीये आणि अली प्रचंड लाजणार आहे. त्याची आई देखील हे सगळे खूपच एन्जॉय करणार आहेत. 

अलीला आपली योग्य वधू शोधण्यात आणि या कार्यक्रमात चांगली डिश बनवण्यात यश मिळाले का की करण आणि अंकिता चांगल्या डिश बनवून या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवेल हे तुम्हाला कार्यक्रम पाहिल्यावरच कळणार आहे.

किचन चॅम्पियन हा कार्यक्रम प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार दुपारी १ वाजता कलर्सवर पाहायला मिळते. 

टॅग्स :कलर्स