Join us

करिश्मा तन्नाचं लग्न होणार या खास दोन पद्धतीने, बॉयफ्रेंंड वरुण बंगेरासोबत घेणार सातफेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 14:11 IST

करिश्मा तन्ना (Karishma Tanna) ५ फेब्रुवारीला मुंबईतील बिझनेसमन आणि तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेरा (Varun Bangera)सोबत लग्नगाठ बांधणार आहे.

करिश्मा तन्ना (Karishma Tanna) ५ फेब्रुवारीला मुंबईतील बिझनेसमन आणि तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेरा (Varun Bangera) सोबत लग्नगाठ बांधणार आहे. करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांचे लग्न दोन दिवस चालणार आहे. ४ फेब्रुवारीपासून लग्नाचे कार्यक्रम सुरू होतील. 4 फेब्रुवारीला मेहंदी आणि संगीत सोहळा होणार असून त्यानंतर 5 फेब्रुवारीला हळदी आणि लग्नसोहळा होणार आहे. दोघांनीही अद्याप आपल्या लग्नाबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही, पण बातमी अशी आहे की, दोघांचे लग्न खूप खास असणार आहे आणि यासाठी दोन्ही कुटुंबांनी खास तयारी केली आहे.

गुजराती आणि दक्षिण भारतीय परंपरेनुसार लग्न होणारकरिश्मा तन्ना (Karishma Tanna)आणि वरुण बंगेरा (Varun Bangera)  यांचा विवाह दोन पद्धतीने होणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, लग्न गुजराती आणि दक्षिण भारतीय परंपरेनुसार होणार आहे. वास्तविक, करिश्मा गुजराती आहे, त्यामुळे लग्नाचे विधी गुजराती तर वरुण हा दक्षिण भारतीय आहे. त्यामुळे दोनही पद्धताने लग्न होणार आहे.

50 पाहुण्यांची यादी कोविडच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने या कपल पुन्हा पाहुण्यांची यादी तयार केली आहे. असे बोलले जात आहे की दोघांनाही हे लग्न मित्र आणि नातेवाईकांसोबत मोठ्या थाटामाटात करायचे होते, त्यासाठी त्यांनी  नियोजनही केले होते, परंतु कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ते पाहता ते  शक्य होईल असे दिसत नाही. कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन पाहुण्यांची यादी ५० पर्यंत कमी करण्यात आली आहे.

टॅग्स :करिश्मा तन्नाटिव्ही कलाकार