चालू वर्षात अनेक सेलिब्रिटी कपलचे लव्हलाईफ संपुष्टात आले. अरबाज खान-मलाईका, फरहान अख्तर-अधुरा, रणबीर कपूर-कॅटरिना, सुशांत सिंह राजपूत-अंकिता लोखंडे..असे अनेक सेलिब्रिटी कपल विभक्त झाले. दुर्दैवाने या यादीत आणखी एका कपलची भर पडली आहे. होय, उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना या जोडप्यानेही आपले नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द उपेन पटेल यानेच या ब्रेकअपची अधिकृत घोषणा केली.करिश्मा व मी आम्ही विभक्त झालोयं, असे त्याने सोशल मीडियावर शेअर केले. ‘बिग बॉस’च्या घरात उपेन व करिश्मा प्रेमात पडले होते. दुर्दैवाने हे प्रेम फार काळ टिकले नाही..
much has come 2light & shown its true colours. love is never easy and when a certain foundation is broken it's impossible 2move forward.
— upen patel (@upenpatelworld) Me and Karishma have both agreed to part ways. Thank you for all your love. 11:33 AM - 7 May 2016
Twitter Link: https://twitter.com/upenpatelworld/status/728827507051364352