कार्तिकी गायकवाडनेही चाहत्यांसह शेअर केली GOOD NEWS, होतोय शुभेच्छांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:19 PM2021-08-16T17:19:14+5:302021-08-16T17:26:12+5:30
गायिका कार्तिकी गायकवाड हिने डिसेंबर 2020 मध्ये रोनित पिसे सोबत लग्न केले. तर हे दाम्पत्य एकमेकांसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.दोघेही सोशल मीडियावर कपल गोल देत असतात.
सारेगमप लिटील चॅम्प्सच्या नवीन पर्वात कार्तिकी गायकवाड परिक्षक म्हणून या कार्यक्रमात झळकतेयं. विशेष म्हणजे लिटील चॅम्पच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड आहे. सारेगमप लिटील चॅम्प्समुळे आयुष्यच बदलून गेल्याच्या भावना कार्तिकीने व्यक्त केल्या होत्या.
तिने सांगितले होते की, सारेगमपच्या मंचाने आमची ओळख निर्माण केली, या कार्यक्रमामुळे आमच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. या कार्यक्रमातील आमचा प्रवास हा आमच्यासाठी अविस्मरणीय असा आहे.
एक आई जशी आपल्याला बाळाला नेहमी जवळ करत असते तसंच झी मराठीने सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या आमच्या पर्वा नंतरदेखील आम्हाला अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे आमची कला सादर करण्याची संधी दिली त्यामुळे आमची या कार्यक्रमाशी असलेलं नातं अधिकचं दृढ होत गेलं आणि आता पुन्हा याच मंचावर ज्यूरीच्या भूमिकेतून आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आलो आहोत त्यामुळे एक वेगळी जबाबदारी आहे पण सगळ्यांचा आमच्यावर असलेला विश्वास पाहता आम्ही ती जबाबदारी नीट पार पडू अशी खात्री आहे. याच मंचावर पुन्हा एकत्र आल्यामुळे जुन्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतोय.
कार्तिकी गायकवाड आज घराघरात पोहचली आहे. या शोमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. गायिका कार्तिकी गायकवाडला परिक्षकाच्या खुर्चीत बसलेलं पाहून तिच्या चाहत्यांना तर आनंद होतो. या शोमुळे पुन्हा एकदा कार्तिकी छोट्या पडद्यावर झळकत आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे कार्तिकी भलतीच खूश असून तिने आपला आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. फॅन्सकडून प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला मिळणारं प्रेम हे विशेष तसंच तितकंच खास असतं. सोशल मीडियावर तब्बल 1 लाख फॅन फॉलोइंग टप्पा कार्तिकीने गाठला आहे. कार्तिकीने आपला हाच आनंद व्यक्त करत आपल्या फॅन्सचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
गायिका कार्तिकी गायकवाड हिने डिसेंबर 2020 मध्ये रोनित पिसे सोबत लग्न केले. तर हे दाम्पत्य एकमेकांसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.दोघेही सोशल मीडियावर कपल गोल देत असतात. त्यांचे प्रत्येक फोटोंना चाहते भरभरुन लाईक्सचा वर्षाव करत असतात. दोघांमध्ये असलेली केमिस्ट्रीही चाहत्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे कार्तिकी आणि रोनित हे कपल चाहत्यांचे आवडते कपल बनले आहेत.