'कसौटी जिंदगी की' मालिकेत अनुराग बसू भूमिकेत सीजेन खान झळकला होता. अनुराग बासू बनत त्याने चाहत्यांची पसंती तर मिळवलीच पण याच मालिकेतून त्याला तुफान लोकप्रियताही मिळाली. अनुराग बासू आणि प्रेरणा भूमिकेत श्वेता तिवार या दोघांचीही जोडीला रसिकांना प्रंचड पसंती दिली होती. दोघेही त्यावेळी रसिकांचे फेव्हरेट ऑनस्क्रीन कपल बनले होते. मालिका बंद झाली आणि मालिकेतील कलाकारही त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त झाले. नुकताच सीजेन खानचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत सीजेन खानला ओळखणंही कठिण जात आहे.
एकेकाळी देखण्या कलाकारामध्ये सीजेनचे नाव गणले जायचे. आता त्याच सीजनेला ओळखणंही मुश्किल झाले आहे. इतका त्याच्या लूकमध्ये बदल झाला आहे. पूर्वीप्रमाणे हँडसम दिसणारा सीजेन आता तितका हँडसम दिसत नाही. विशेष म्हणजे सीजेन अजूनही अविवाहीत आहे. तो ४३ वर्षाचा असून लवकरच गर्लफ्रेंडसह लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.२०२० मध्ये तो लग्न करणार होता मात्र कोरोनामुळे लग्नाचा प्लॅन त्याने पुढे ढकलत या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे.
दिलेल्या मुलाखतीत सीजेनने सांगितले की, बिग बॉस १४ साठी त्याला ऑफर देण्यात आली होती. मात्र यंदाच्या सिझनमध्ये सहभागी होण्यात त्याला रस नव्हता.त्यामुळे त्याने नकार दिला.शोकडून मिळणारे मानधनही त्याला हवे तेवढे मिळत नव्हते. म्हणून त्याने नकार कळवला.
सीजने बहुतांश वेळ दुबईमध्येच राहतो. या व्यतिरिक्त तो न्यूयॉर्क शहरातील आपल्या व्यवसायावरही लक्ष केंद्रित करत आहे. कसौटी नंतर त्याने पाकिस्तानी मालिका 'पिया के घरा जाना है' मध्येही त्याने काम केले आहे. त्याच्यासह करणवीर बोहरा, दिपानीता शर्मा, इमरान अब्बास नकवी हेदेखील यात दिसले होते. या व्यतिरिक्त तो आणखी एक पाकिस्तानी मालिका 'सिलिसिले चाहत' मध्येही तो झळकला होता.
कसौटी मालिकेने मला पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यासाठी एकता कपूरचे खूप खूप आभार, तिने त्यावेळी संधी दिली नसती तर इतके रसिकांचे प्रेम मला मिळाले नसते. एक कलाकार म्हणून याच मालिकेने मला घडवले आहे.
आता काळ बदलला आहे.पूर्वीप्रमाणे आता मला इतके महत्त्वही दिले जात नाही. अनेकांना वाटते की मी भारतात राहत नाही. परदेशात स्थायिक झालोय, खास त्यांना सांगू इच्छितो मी, कुठेही गेलेलो नाहीय, मी भारतातच राहतोय.