Join us

KBC : खेळासंबंधी प्रश्नावर स्पर्धकाने वापरल्या दोन लाइफलाईन, तुम्हाला माहीत आहे का उत्तर?

By अमित इंगोले | Published: October 31, 2020 10:31 AM

शिवानी यांनी ५ हजार रूपयांच्या प्रश्नावर पहिली लाइफलाईन गमावली होती. शुक्रवारी सर्वातआधी शिवानीला विचारण्यात आले आहे की, कोणत्या देवाला शंभु नंदन आणि गौरी नंदन नावाने ओळखलं जातं?

'कौन बनेगा करोडपती'मध्ये शुक्रवारीच्या एपिसोडमध्ये डिझाइन इंजिनिअर शिवानी संकपाल हॉट सीटवर बसल्या होत्या. त्यांनी खेळाला फारच समजदारीने सुरूवात केली. शिवानी या ६ लाख ४० हजार रूपये रक्कम जिंकून गेल्या. त्यांनी १२ लाख ५० हजार रूपयांच्या प्रश्नावर खेळ क्विट केला. पण या प्रश्नापर्यंत येईपर्यंत शिवानी यांनी त्यांच्या सर्व लाइफलाईन वापरल्या होत्या.  

शिवानी यांनी ५ हजार रूपयांच्या प्रश्नावर पहिली लाइफलाईन गमावली होती. शुक्रवारी सर्वातआधी शिवानीला विचारण्यात आले आहे की, कोणत्या देवाला शंभु नंदन आणि गौरी नंदन नावाने ओळखलं जातं? याचं योग्य उत्तर त्यांनी भगवान गणेश असं दिलं. (KBC: १२ लाख ५० हजारांच्या प्रश्नावर क्विट केला खेळ, काय होतं उत्तर तुम्ही करा गेस....)

त्यानंतर शिवानी यांनी दुसरी लाइफलाईन १,६,००० रूपयांच्या प्रश्नावर वापरली होती. या अमेरिकेतील समाजसेव व्यक्तीला ओळखा. त्या जगातल्या सर्वात मोठ्या प्रायव्हेट चॅरिटेबल संस्थांपैकी एकाच्या को-फाउंडर आहे? या प्रश्नादरम्यान शिवानी यांना एक फोटो दाखवण्यात आला होता. जो ओळखायचा होता.

या प्रश्नावर गमावल्या दोन लाइफलाईन

यानंतर शिवानी यांना ३ लाख २० हजार रूपयांचा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न होता की, एशियन गेम्स  २०२२ ला कोणतं शहर होस्ट करणार आहे. याच्या उत्तराबाबत त्या थोड्या कन्फ्यूज होत्या. त्यांनी आधीच व्हिडीओ कॉल अ फ्रेन्ड लाइफलाईन वापरली होती. पण त्यांच्या मित्रालाही याचं बरोबर उत्तर माहीत नव्हतं. त्या कन्फ्यूज होत्या. त्यानंतर शिवानी यांनी एक्सपर्टचा सल्ला घेतला. आणि त्यांनी तो सल्ला मानला. (KBC : 'या' १४ प्रश्नांची उत्तरे देत १ कोटीपर्यंत पोहोचल्या होत्या छवि, १५व्या प्रश्नावर अडकल्या आणि...)

या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं - Hangzhou. यानंतर शिवानी यांनी १२ लाख ५० हजार रूपयांच्या प्रश्नावर खेळ क्विट केला. 

२४ वर्षीय शिवानी पुण्याच्या राहणाऱ्या आहेत. गेल्या २ वर्षांपासून शिवानी एक ज्युनिअर डिझाइन इंजिनिअर म्हणून काम करत आहे. त्यांनी आतापर्यंत ३० ते ४० क्रेन डिझाइन केल्या आहेत. शिवानी यांनी त्यांच्या आईने वाढवलं आहे. जेव्हा त्या ४ महिन्यांच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं.   

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीटेलिव्हिजनअमिताभ बच्चन