'कौन बनेगा करोडपती'च्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये बिहारच्या रूबी सिंह हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांनी पूर्ण खेळ फार शांतपणे आणि समजदारीने खेळला. अमिताभ बच्चन यांनीही रूबी यांचं फार कौतुक केलं. रूबी या शोमध्ये २५ लाख रूपये जिंकून गेल्या. रूबी यांनी २५ लाख रूपयांच्या प्रश्नासाठी तीन लाइफलाईन व्हिडीओ कॉल, फ्लिप द क्वश्चन, आस्क द एक्सपर्ट वापरल्या होत्या.
त्यांना २५ प्रश्न लाख रूपयांचा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न होता - अजीम उस शान कोणत्या मुघल शासकाचा नातू होता. ज्यांच्या नावावर १७०४ मध्ये पटणाचं नाव अजीमाबाद करण्यात आलं होतं? पर्याय होते - अकबर, औरंगजेब, शाहजहां हुमायूं. (KBC 12 ची पहिली करोडपती ठरली नाझिया नसीम; 7 कोटी जिंकण्यात होणार का यशस्वी?)
या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं औरंगजेब.
या प्रश्नाचं उत्तर रूबी यांना माहीत नव्हतं. त्यांनी आधी व्हिडीओ कॉल लाइफलाईन वापररली. पण याचा काहीच फायदा झाला नाही. त्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी आणखी एक लाइफलाईन फ्लिप द क्वेश्चन वापरली.यावेळी त्यांना वेगळा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न होता वाल्मिकी रामायणनुसार सुग्रीवच्या पत्नीचं नाव काय होतं, जिला बालीने बळजबरीने मिळवलं होतं? पर्याय होते - रूमा, रंभा, दमयंति, सरूची'. (KBC: स्पर्धकाने १२ लाख ५० हजारांच्या मुंबईसंबंधी प्रश्नावर क्विट केला शो, तुम्हाला माहीत आहे का उत्तर?)
या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं रूमा.
रूबी यांना याही प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. त्यांनी नंतर आस्क द एक्सपर्ट लाइफलाईन घेतली आणि त्यांना बरोबर उत्तर मिळालं. अशाप्रकारे त्या २५ लाख रूपये जिंकल्या.
कोणत्या प्रश्नावर क्विट केला शो?
यानंतर रूबी यांनी ५० लाख रूपयांच्या प्रश्नावर शो क्विट केला. त्यांच्याकडे ५० लाख रूपयांच्या प्रश्नावेळी कोणतीही लाइफलाईन शिल्लक राहिली नव्हती. प्रश्न होता - भारतात प्रकाशित होणारं पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं? पर्याय होते - बॉम्बे समाचार, हिकीज बंगाल गॅजेट, मद्रास कुरिअर, बॉम्बे हेराल्ड.
बरोबर उत्तर होतं - हिकीज बंगाल गॅजेट.
दरम्यान, रूबी कटिहार बिहारमध्ये शिक्षिका आहेत. त्यांचं स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न होतं. आता त्या हे स्वप्न केबीसीमध्ये जिंकलेल्या रकमेतून पूर्ण करणार आहेत.