'कौन बनेगा करोडपती'मध्ये गुरूवारी रेखा राणी ही हॉटसीटवर बसली होती. तिने आपल्या मजेदार अंदाजाने सर्वांची मने जिंकली. अमिताभ बच्चनही तिच्यावर खूश होते. ती शोमधून ६ लाख ४० हजार रूपये जिंकून गेली. शोमध्ये तिने सांगितले होते की, ती लोअर मिडल क्लासमधून आहे आणि आयुष्यात कधीही इतके पैसे जिंकले नाहीत.
रेखा राणीने या प्रश्नावर केलं क्विट
रेखाने शोमध्ये १२ लाख ५००० रूपयांच्या प्रश्नावर शो क्विट केला. सईद मिर्झा 'नसीम' मध्ये नसीमच्या आजोबांची भूमिका कोणत्या कवींनी साकारली होती. पर्याय होते (A) कैफी आजमी, (B) मजरूह सुल्तानपुरी, (C) गुलजार, (D) जावेद अख्तर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं कैफी आजमी. (KBC: स्पर्धक असं काय म्हणाली की, अमिताभ यांना शाहरूख खानची मागावी लागली माफी?)
रेखा राणी दिल्लीची राहणारी असून २७ वर्षांची आहे. ती लोअर मिडल क्लासमधून येते. शोमध्ये रेखाने अमिताभ बच्चन यांना सांगितले की, तिने आयुष्यात कधीही इतके पैसे पाहिले नाही. कोरोनामुळे घरात पैशांची इतकी चणचण होती की, दूधही विकत घेऊ शकत नव्हते. एक वेळ तर अशी आली होती की, कुणालाही कॉल केला तर सर्वांना असं वाटत होतं की, पैसे मागण्यासाठी फोन केला. त्यामुळे कुणी फोनही उचलत नव्हते. अशावेळी माझ्या मित्रांनी माझ्यासाठी खूप काही केलं. एवढं तर सख्खे नातेवाईकही करत नाही. रेखा राणीचे वडील ऑटो रिक्षा चालवतात. (KBC : खेळासंबंधी पहिल्याच प्रश्नावर अडकला स्पर्धक, घ्यावी लागली लाइफलाईन....)
अमिताभ यांच्याकडे व्यक्त केली खंत
शोमध्ये रेखाने सांगितले की, शाहरूख खान तिचा फेव्हरेट अभिनेता आहे. आणि जेव्हा अमिताभ यांनी मोहब्बतें सिनेमात शाहरूखला रागावलं होतं तेव्हा तिला फार वाईट वाटलं होतं. यावर अमिताभ बच्चन हे त्यांच्या सफाईत वेगवेगळ्या गोष्टी सांगतात पण स्पर्धक काही ऐकायला तयार होत नाही. उलट अमिताभ बच्चन म्हणतात की, मी नाही तर शाहरूखनेच मला सिनेमात रागावलं होतं. पण दिल्लीहून आलेली स्पर्धक रेखा राणीने बिग बी यांचं काहीच ऐकलं नाही. नंतर स्पर्धक म्हणते की, 'कभी खुशी कभी गम' मध्ये तर तुम्ही शाहरूख खानला घरातून बाहेर काढलं होतं. मी तेव्हा फार लहान होते आणि खूप रडले होते. अमिताभ पुन्हा सांगतात की, त्यांना असं करण्यासाठी स्क्रीप्ट रायटरने सांगितलं होतं.
शाहरूखला माफी मागण्यास तयार
अखेर अमिताभ बच्चन म्हणतात की, त्यांना दु:खं आहे की, त्यांनी रेखा राणी यांचं मन दुखवलं. ते हात जोडून शाहरूख खानला माफी मागतात आणि जेव्हाही ते शाहरूखला भेटतील तेव्हा त्यालाही यासाठी माफी मागतील. तेव्हा कुठे स्पर्धक रेखा राणी खूश झाली.