कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा 10 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन असून या नव्या सिझन साठी ते खूपच उत्सुक आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारसोबत गप्पा मारल्या. त्यावेळी छोटा पडदा म्हटला की, टीआरपीचे गणित हे असते. कौन बनेगा करोडपतीच्या टीआरपी बाबत तुम्हाला किती टेन्शन येते असे विचारले असता त्यांनी सांगितले की, कार्यक्रमाचा टीआरपी कसा मोजतात हेच मला माहित नाहीये. मी त्याचा कधी अभ्यास केलेला नाहीये. मी कौन बनेगा करोडपतीचे चित्रीकरण मनापासून करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला खूप साऱ्या लोकांना भेटता येते, त्यांचे आयुष्य जाणून घेता येते. हा अनुभव खूपच छान असतो. मी एकदा चित्रीकरण केले की, टीआरपी आला की नाही याचा विचार करत नाही. एक कलाकार म्हणून आपण आपले काम करावे असे मला वाटते. टीआरपीचे टेन्शन घेऊ नये.
कौन बनेगा करोडपतीच्या इतिहासात नोंदणीसाठी लोकांनी दिलेला हा प्रतिसाद अभूतपूर्व होता. अर्थात त्यापैकी अगदी मोजक्या भाग्यवंतांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते. तरीही हा कार्यक्रम लोकांचे नशीब बदलणारा आणि आपल्या ज्ञानाची ताकद आजमावणार्या लोकांसाठी बनलेला आहे. कौन बनेगा करोडपती या शोमधून अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांना करोडपती बनवले. केबीसीच्या याच प्रश्नाच्या रंगमंचावर छोट्या छोट्या गावातल्या स्पर्धकांची मोठी स्वप्न साकार होतात. देवीयों और सज्जनो! हे बिग बी अमिताभ बच्चन यांचे हे शब्द पुन्हा एकदा घराघरात घुमणार आहेत.