सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सिनेइंडस्ट्रीबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यात गायक सोनू निगमनेदेखील म्युझिक इंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव समोर आणले. त्यानंतर आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील कलाकारदेखील पुढे येत असून टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील वास्तव सांगत आहेत. एफआयआर फेम अभिनेत्री कविता कौशिकनेदेखील टेलिव्हिजन इंडस्ट्रीत तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले.
एफआयआर मालिकेत इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटालाच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री कविता कौशिकने सांगितले की, नेपोटिझम शिवाय बऱ्याच समस्या इंडस्ट्रीत आहे. नेपोटिझमला घेउन स्टार किड्सवर हल्ला करणे व्यर्थ आहे, याउलट समस्या दुसरीकडे आहे. सर्वांना या सिस्टमच्या विरोधात लढले पाहिजे.
कविताने आणखीन एक ट्विट केले आणि सांगितले की, एफआयआर बंद झाल्यानंतरही निर्मात्यांकडून तिला धमकी येत होते. निर्माते तिला चंद्रमुखी चौटालासारखी भूमिका न करण्याची धमकी देत होते.
ती पुढे ट्विटमध्ये म्हणाली की, कालच मला आठवले की, जर मी कुठेही हरियाणवी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करेन तर माझ्यावर केस केली जाणार. ही मालिका बंद होऊन पाच वर्षे उलटले आहेत. प्रेक्षकांच्या मागणीनंतरही ही मालिका पुन्हा सुरू करत नाही आणि तुम्ही मुव्ही माफियाबद्दल बोलत आहात.
तिने सांगितले की, जेव्हा मी सांगितले की, मी हरियाणवी पोलीस अधिकारी किंवा पंजाबी पोलीस अधिकारीच्या कन्सेप्टवर आधारीत चित्रपटात काम करण्याचे प्लानिंग करते आहे. तेव्हा त्यांनी मला केस करू याची आठवण करून दिली. त्यावर मी त्यांना आठवण करून दिली की मराठी पोलीस अधिकारीच्या जागी हरियाणवी पोलीस अधिकारीची कल्पना मी दिली होती. त्यावर ते म्हणाले की त्याचे आम्ही तुला पैसे दिले होते.
कविता म्हणाली की, फक्त नेपोटिझम ही समस्या नाही. चॅनेल आणि प्रोड्युसर मिळून रॉयल्टी, कलाकार व टेक्निशिएनसोबत मिळून बनवलेल्या प्रोडक्टचे राइट्स व बदनाम करण्याची ताकद व कॉन्ट्रॅक्टचे जाळेदेखील एन्जॉय करत असतात. खऱ्या समस्येशी लढा. स्टार किड्सना निशाणा बनवणे व्यर्थ आहे.