प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकभूस्खलनात अडकली आहे. ती बद्रीनाथहून परतत असताना भूस्खलनामुळे बद्रीनाथ मार्गावरील जोशीमठमध्ये ४ दिवसांपासून अडकली आहे. कविता सध्या जोशीमठच्या आर्मी कॅम्पमध्ये पती रोनित बिस्वास सोबत राहत आहे.
अभिनेत्रीने सांगितलं की, रस्ता मोकळा करण्यासाठी पोलीस, आर्मी आणि बॉर्डर ऑर्गनायजेशन खूप मेहनत घेत आहेत. पण एक भूस्खलन झालेलं असतानाच दुसरं होतं. यामुळे बराच वेळ जातो. परंतु त्यांनी सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी ठेवलं आहे. हे भयानक आहे पण मी उत्तराखंड पोलीस आणि आर्मीला सलाम करते की ते सर्व पर्यटकांच्या सुरक्षिततेची आणि कम्फर्टटी काळजी घेत आहेत.
५ जुलै रोजी रोनितचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कविता तिचा नवरा रोनित बिस्वास, चुलत भाऊ आणि त्यांचा पेट डॉग यांच्यासह बद्रीनाथला गेली होती. ते डेहराडूनहून बद्रीनाथला गेले आणि भगवान बद्रीनाथचे दर्शन घेतले. पण परतत असताना भूस्खलन झालं आणि चार दिवसांपासून तिथेच अडकली आहे.
कविताने सांगितलं की, "बद्रीनाथमध्ये दर्शन घेतल्यानंतर ते माना येथे गेले. माना येथील ट्रिप त्यांच्यासाठी स्वर्गासारखी होती. आम्ही धबधब्यात आंघोळ केली, ट्रेकिंगला केली. पण त्याच दिवशी भूस्खलन झालं आणि आम्ही ३ दिवस मानामध्ये अडकलो. तेव्हा मला मजा येत होती कारण माना खूप सुंदर ठिकाण आहे आणि मला पर्वत आवडतात."
"आठ जुलैला जेव्हा रस्ता मोकळा झाला तेव्हा आम्ही जोशीमठ येथे आले. येथे आल्यावर आम्हाला समजलं की दोन ठिकाणी मोठं भूस्खलन झालं आहे. त्यामुळे हायवे पूर्णत: ब्लॉक आहे. आता आम्ही येथे अडकलो आहोत. हा एक आर्मी कँप आहे. माझ्या नवऱ्याचे एक मित्र आर्मी ऑफिसर आहेत. ते आमची नीट काळजी घेत आहेत. मात्र अनेक लोक अजुनही अडकलेले आहेत."
"रेस्टॉरंट आणि हॉटेल्सवाले वॉशरुम वापरण्यासाठी २०० रुपये चार्ज करत आहेत. आर्मीच्या लोकांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तेथे जाऊन हॉटेल कर्मचाऱ्यांना पर्यटकांना मदत करण्यास सांगितलं. इथे हजारो गाड्या अडकल्या आहेत, त्यामुळे किती लोक इथे अडकले असतील याची तुम्ही कल्पना करू शकता."
"मी चार दिवसांपासून येथे अडकले असून आता मी अस्वस्थ झाली आहे. आम्हाला लवकरात लवकर डेहराडूनला पोहोचायचं आहे कारण मला काशीपूरला एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. मला त्यागोष्टीची खूप काळजी वाटते. मी आशा करते की मला माझी कमिटमेंट मोडण्याची गरज भासणार नाही कारण मला तसं करायला अजिबात आवडत नाही" असं कविताने म्हटलं आहे.