सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ‘काव्या - एक जज्बा, एक जुनून’ मालिकेत नाट्यमय घडमोडींमुळे ट्विस्ट आला आहे. काव्या (सुंबुल तौकीर खान) आणि अधिराज (मिश्कत वर्मा) यांच्यातील ताटातुटीमुळे गैरसमज आणखी वाढत आहेत. काव्याचा विभक्त प्रियकर शुभम (अनुज सुल्लेरे) याने संशयाची बीजे पेरली आहेत. राजीवला तुरुंगात डांबण्याच्या कटात अधिराजचा सहभाग होता, या शुभमच्या आरोपांमुळे टोक गाठले जाते. मात्र, काव्या आणि अधिराजसाठी नियतीच्या मनात काही वेगळेच चाललेले असते. दोघांतही प्रेमाचे वारे हळुवारपणे वाहायला सुरुवात झालेली आहे.
दिवाळी पार्टीच्या दरम्यान, शुभम या दोघांची भेट न होऊ देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. मात्र, परिस्थितीच अशी काही निर्माण होते की, त्यातून काव्या आणि अधिराज हे डान्स फ्लोअरवर एकत्र येतात. ते एक रोमँटिक नृत्याचे सादरीकरण करतात. यातून त्यांच्यातील निर्विवाद प्रेमभावनांची सर्वांना खातरजमा होतो.