Join us

'काव्यांजली- सखी सावली' धक्कादायक वळणावर, काव्या आणि अंजलीच्या जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 19:18 IST

Kavyanjali-Sakhi Sawali : 'काव्यांजली- सखी सावली' मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या या मालिकेत धक्कादायक वळण आले आहे.

कलर्स मराठीवरील 'काव्यांजली- सखी सावली' मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील काव्या आणि अंजली या बहिणी घराघरात पोहचली आहेत. बहिणी असल्या तरी त्यांच्यात आई लेकीचं नात आहे. सध्या या मालिकेत धक्कादायक वळण आले आहे. काव्या आणि अंजलीचा जीव धोक्यात आहे. काव्यांजली- सखी सावली मालिका महारविवार, ११ फेब्रुवारी, दुपारी २ वाजता आणि रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळेल. 

कलर्स मराठीवरील काव्यांजली- सखी सावली या लोकप्रिय मालिकेचा या रविवारचा महाएपिसोड काव्या आणि अंजली या दोन जीवाभावाच्या बहीणींच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ करणारा ठरणार आहे. या महाएपिसोडमध्ये अंजलीच्या नवऱ्याची माजी प्रेयसी निकिताने खेळलेला एक जीवघेणा डाव अंजली बरोबरच काव्याच्या जीवावरही बेतणार आहे. 

अनपेक्षितपणे हा डाव यशस्वी करण्यासाठी श्रेष्ठाची ही साथ लाभणार आहे. या संकटातून या दोघी बहिणी मार्ग काढू शकतील की त्यांची साथ कायमची सुटेल ? प्रीतम आणि विश्वजित त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांना वाचवू शकतील का ? अशी खिळवून ठेवणारी थरारक गोष्ट या महाएपिसोडमध्ये पाहता येईल.  

टॅग्स :कलर्स मराठी