Join us

KBC : 'या' १४ प्रश्नांची उत्तरे देत १ कोटीपर्यंत पोहोचल्या होत्या छवि, १५व्या प्रश्नावर अडकल्या आणि...

By अमित इंगोले | Published: October 30, 2020 9:27 AM

KBC : छवि कुमार यांनी फारच संयमाने आणि समजदारीने खेळ खेळला. फार लवकरच त्या १ कोटी रूपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या.

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' मध्ये हॉटसीटवर उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमधील छवि कुमार आल्या होत्या. छवि कुमार या शिक्षीका असून इंग्रजी विषय शिकवतात. तर त्यांचे पती एअरफोर्स अधिकारी आहेत. छवि यांनी बुधवारी दमदार खेळ खेळला आणि गुरूवारी रोलओव्हर स्पर्धक म्हणून आल्या.

छवि कुमार यांनी फारच संयमाने आणि समजदारीने खेळ खेळला. फार लवकरच त्या १ कोटी रूपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या. मात्र, छवि कुमार या १ कोटी रूपयांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी खेळ क्विट केला. त्या केवळ ५० लाख रूपये जिंकून गेल्या. चला जाणून घेऊन कोणकोणत्या १५ प्रश्नांची उत्तरे देत त्या १ कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या.

प्रश्न पहिला  

कोणत्या अभिनेत्याने दिल, दिल चाहता है आणि दिल है की मानता नही या सर्व सिनेमात काम केलं आहे?

A. सलमान खान

B. शाहरुख खान

C. आमिर खान

D. सैफ अली खान

बरोबर उत्तर - आमिर खान

प्रश्न दुसरा

हा चपातीचा कोणता प्रकार आहे?

A. भटूरा

B. लच्छा पराठा

C. नान

D. तंदूरी रोटी

बरोबर उत्तर - लच्छा पराठा

प्रश्न तिसरा

या नावेंची स्थानिक नावं काय आहेत?

A. शिकारा

B. सुथन

C. कांगर

D. फेरन

योग्य उत्तर- शिकारा

प्रश्न चौथा

डंक आणि ड्रिबल अशा शब्दांचा वपर कोणत्या खेळात केला जातो?

A. बास्केटबाल

B. वॉलीबॉल

C. टेनिस

D. क्रिकेट

योग्य उत्तर - बास्केटबॉल

प्रश्न पाचवा

मसाबा गुप्ता, तरूण तहिलियानी आणि रितु कुमार यांनी कोणत्या व्यवसायात प्रसिद्धी मिळवली?

A. नृत्य दिग्दर्शन

B. इंटीरियर डिजाइनिंग

C. गायन

D. फॅशन डिजाइनिंग

बरोबर उत्तर- फॅशन डिजाइनिंग

प्रश्न सहावा

भगवान विष्णुच्या कोणत्या अवताराने कालिया मर्दन आणि पूतनेचा वध केला होता?

A. भगवान राम

B. भगवान कृष्ण

C. भगवान नरसिंह

D. भगवान वामन

बरोबर उत्तर -भगवान कृष्ण

प्रश्न सातवा

या ऑडिओ क्लिपमध्ये कोणत्या आजाराला आळा घालण्याबाबत बोललं जात आहे?

A. डेंगू

B. कोरोना वायरल

C. स्वाइन फ्लू

D. मलेरिया

बरोबर उत्तर - डेंग्यू

प्रश्न आठवा

भारतीय वायूसेनेच्या या एअरोबॅटीक टीमचं नाव काय आहे?

A. सारंग

B. पवन

C. थंडरबोल्ट्स

D. डेयरडेविल्स

बरोबर उत्तर - सारंग

प्रश्न नववा

भारताच्या कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात माजी संस्थानिकांच्या शासकांना दिली जाणारी प्रिवी-पर्स म्हणजे राजभत्ते बंद करण्यात आले होते?

A. लाल बहादुर शास्त्री

B. राजीव गांधी

C. इंदिरा गांधी

D. मोरारजी देसाई

बरोबर उत्तर - इंदिरा गांधी [50ः50 लाइफलाइन घेऊन याचं उत्तर दिलं)

प्रश्न दहावा

लुम्बिनी कोणत्या धार्मिक महापुरूषांचं जन्मस्थान आहे?

A. महावीर

B. चैतन्य महाप्रभु

C. गौतम बुद्ध

D. 14वें दलाई लामा

बरोबर उत्तर - गौतम बुद्ध [या प्रश्नासाठी फोन अ फ्रेन्ड लाइफलाईन वापरली. नंतर क्लिप द क्वशंन लाइफलाईन वापरली)

प्रश्न अकरावा

फाळणीनंतर १९४८ मध्ये पाकिस्तानच्या फेडरल कॅपिटल टेरिटरीला कोणतं शहर बनवण्यात आलं?

A. पेशावर

B. रावलपिंडी

C. लाहोर

D. कराची

बरोबर उत्तर - कराची [याच्या उत्तरासाठी छवि यांनी आस्क द एक्सपर्ट लाइफलाईन वापली)

प्रश्न बारावा

व्हिडीओ क्लिपमध्ये दिसणाऱ्या या खेळाडूने २०१८ च्या राष्ट्रमंडळ स्पर्धेत कोणत्या खेळात २ सुवर्ण आणि १ कांस्य पदक जिंकलं होतं?

A. बॅडमिंटन

B. टेबल टेनिस

C. निशानेबाजी

D. तीरंदाजी

बरोबर उत्तर- टेबल टेनिस

प्रश्न तेरावा

गांधीजी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांना कुणी बंगालमध्ये झालेल्या १९४७ च्या धार्मिक दंगलीला यशस्वीपणे नियंत्रित करण्यासाठी वन मॅन बाउंड्री फोर्स म्हटलं होतं?

A. जॉन साइमन

B. क्लीमेंट एटली

C. विंस्टन चर्चिल

D. लार्ड माउंटबॅटन

बरोबर  उत्तर - लॉर्ड माउंटबॅटन

प्रश्न चौदावा

सरोजिनी नायडू यांनी कोणत्या भाषेत आपलं प्ले मेहर मुनीर लिहिलं होतं?

A. उर्दू

B. इंग्रजी

C. फारसी

D. तेलुगू

बरोबर उत्तर - फारसी

प्रश्न पंधरावा (१ कोटी  रूपयांचा प्रश्न)

२०२४ पर्यंत पहिली महिला आणि पुढील पुरूषाला चंद्रावर उतरवण्यासाठी अमेरिकन अंतराळ कार्यक्रमाला कोणत्या यूनानी देवीचं नाव देण्यात आलं आहे?

A. रिया

B. नेमेसिस

C. एफ्रोडाइट

D. अर्टेसिस

बरोबर उत्तर - अर्टेमिस

छवि कुमार यांना या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांनी रिस्क न घेता खेळ क्विट केला. खेळ सोडण्याआधी त्यांनी ए रिया हे उत्तर गेस केलं. मात्र, बरोबर उत्तर अर्टेमिस हे होतं. म्हणजे छवि कुमार यांचं मोठं नुकसान टळलं. 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनटेलिव्हिजन