कौन बनेगा करोडपतीच्या बुधवारच्या एपिसोडची सुरूवात अमिताभ बच्चन यांनी मंगळवारची स्पर्धक फरहत नाजपासून केली. फरहतने ९व्या १ लाख ६० हजार रूपयांच्या प्रश्नापासून खेळाला सुरूवात केली आणि बऱ्याच वेगाने खेळ पुढे सरकला. फरहतला जेव्हा प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे माहीत होतं तेव्हा ती पटकन उत्तर देत होती पण निश्चित नसेल तर तर लाइफलाईन वापर करत होती.
पण अशाप्रकारे लाइफलाईनचा वापर करणं तिला महागातही पडलं. कारण २५ लाखाच्या प्रश्नापर्यंत पोहोचता पोहोचता फरहतने आपल्या सर्व लाइफलाईन वापरल्या होत्या. असं असलं तरी उत्तरप्रदेशच्या रायबरेलीच्या फरहतने ५० लाख रूपयांच्या प्रश्नाचाही सामना केला. (क्या बात! KBC मध्ये स्वप्निल चव्हाणने जिंकले २५ लाख, कामगारांना पगार देऊन सन्मानानं परत बोलवणार!)
काय होता प्रश्न?
५० लाख रूपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता की, १८५७ च्या उठावादरम्यान लखनौचं नेतृत्व करणाऱ्या बेगम हजरत महल यांचं खरं नाव काय होतं? याचे पर्याय होते A.बीबी मुबारिका, B.मेहर-उन-निसा, C.सिकंदर जहां, D.मुहम्मदी खानुम. या प्रश्नाचं उत्तर फरहतला ठामपणे माहीत नव्हतं. त्यामुळे तिने खेळ क्विट करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिला उत्तर गेस करायला लावलं आणि तिने A हा पर्याय निवडला. पण बरोबर उत्तर D होतं म्हणजेच मुहम्मद खानुम. फरहत खेळ क्विट करून २५ लाख रूपये जिंकून गेली.
अंकिता २५ लाखाच्या प्रश्नावर क्विट केला खेळ
दरम्यान, 'कौन बनेगा करोडपती'मध्ये मंगळवारच्या एपिसोडमध्ये हॉटसीटवर छत्तीसगढच्या अंकिता नावाच्या स्पर्धक होत्या. त्यांनी खेळाला चांगली सुरूवात करत १० हजार आणि ३ लाख २० हजाराचा टप्पा पार केला. अंकिता जेव्हा १२ लाख २० हजाराच्या टप्प्यावर पोहचल्या तेव्हा त्यांच्या सर्व लाइफलाईन संपल्या होत्या.
अशात अमिताभ बच्चन यांनी अंकिता यांच्यासमोर २५ लाख रूपयांचा प्रश्न ठेवला. भारतात एफ-१६ फॉल्कन लढावू विमान उडवणारे पहिले भारतीय सैनिक नसलेले सर्वासामान्य व्यक्ती कोण होते?
अंकितांसमोर हा प्रश्न येताच त्या जरा चक्रावल्या. पण पर्याय समोर आल्यावर त्यांना काही शक्यता जाणवू लागल्या होत्या. नियमानुसार अमिताभ बच्चन यांनी अंकिता यांना उत्तराचे चार पर्याय दिलेत. A. जेआरडी टाटा B. रतन टाटा C. राजीव गांधी D. राजेश पायलट. अंकिता या प्रश्नाच्या उत्तरावर बराचवेळी विचार करत होत्या. पण त्यांना नेमकं उत्तर नाही नव्हतं.
काय होतं प्रश्नाचं उत्तर?
खूप विचार केल्यावर आणि उत्तराबाबत श्वाश्वती नसल्याने अंकिता यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. अंकिताने खेळ सोडण्यापूर्वी ऑप्शन बी म्हणजेच रतन टाटा हे उत्तर गेस केलं. पण अंकितांना नंतर फार पश्चाताप झाला. कारण त्यांनी जे उत्तर खेळ सोडल्यावर गेस केलं होतं तेच बरोबर उत्तर होतं. असो अंकिता या १२ लाख ५० हजार रूपये जिंकून गेल्या. पण त्यांची रिस्क घेतली असती तर आणखी जिंकू शकल्या असत्या.