KBC च्या सेटवर वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात जे गेम खेळण्यासोबतच अमिताभ बच्चन यांच्या मजेदार-भावनात्मक बातचीतही करतात. आपले विचारही जगासमोर सांगतात. नुकतेच एक स्पर्धक मध्यप्रदेशातील खंडवा ग्राम पंचायतचे सचिव कौशलेंद्र सिंह तोमर आले होते. खेळ खेळत असताना साधारणपणे अमिताभ बच्चन हे स्पर्धकांना विचारतात की, तुम्ही जिंकलेल्या रकमेचं काय करणार? तसंच तोमर यांनाही विचारलं. पण त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून अमिताभ बच्चन अवाक् झाले.
अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नाचं उत्तर देत कौशलेंद्र म्हणाले की, या पैशातून ते आधी त्यांच्या पत्नीची प्लास्टिक सर्जरी करतील. हे उत्तर ऐकताच अमिताभ बच्चन चकीत झाले. त्यांनी याचं कारण विचारलं तर तोमर यांनी सांगितलं की, १५ वर्षांपासून ते एकच चेहरा बघत आहे. त्यामुळे पत्नीची प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बदलून टाकतील. जेणेकरून नवेपणा जाणवेल. यावर अमिताभ स्पर्धकाच्या पत्नीला म्हणाले की, तुम्ही तर सुंदर दिसता आणि असं अजिबात करू नका. कारण प्लास्टिक सर्जरी केल्यावर खराब होतो. (KBC च्या 'या' प्रश्नात दडलं होतं पतीचं नाव, बघण्यासारखी होती रेणुका शहाणे यांची रिअॅक्शन...)
किती रक्कम जिंकले?
अमिताभ बच्चन यांच्या प्लास्टिक सर्जरी न करण्याच्या सल्ल्यावर तोमर यांची पत्नी होकार देतात. कौशलेंद्रही नंतर म्हणाले की, ते असं अजिबात करणार नाही. ते केवळ गंमत करत होते. दरम्यान तोमर हे खेळ जास्त पुढे नेऊ शकले नाहीत. ते केवळ ४० हजार रूपयेच जिंकले. स्पोर्ट्सशी संबंधित एका प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी ३ लाइफलाईनही घेतल्या, पण त्यांना योग्य उत्तर देता आलं नाही. (KBC मध्ये ५० लाख रूपये जिंकणारी पहिली स्पर्धक ठरली ही महिला, वाचा काय होता ५० लाखाचा प्रश्न?)