अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' हा शो कोरोना काळातही जोरात सुरू आहे. या क्विज शोच्या नव्या आणि वेगळ्या सीझनला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. KBC मध्ये गुरूवारच्या एपिसोडमध्ये दिल्लीचा जय ढोंडे हा स्पर्धक आला होता. आश्चर्याची बाब म्हणजे जयने खेळाच्या सुरूवातीलाच त्याच्या दोन लाइफलाईनचा वापर केला. ज्यामुळे खेळाच्या सुरूवातीलाच असं झाल्याने अमिताभ बच्चनही निराश झाले.
अमिताभ बच्चन यांनी जय ढोंडेला पहिला प्रश्न विचारला की, यातील कोणत्या व्यंजनाबाबत म्हटलं जातं की, याचे 'चार यार' आहेत? अमिताभ यांनी पुलाव, बिरयानी, कबाब और खिचड़ी असे चार पर्याय दिले. (KBC मध्ये ५० लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाला आलं नाही; तुम्हाला येतंय का ट्राय करा!)
काय होतं उत्तर?
जयला या पहिल्याच प्रश्नाच्या उत्तराबाबत काहीच आयडिया नव्हती. त्यामुळे त्याने पहिल्याच प्रश्नासाठी लाइफलाईन घेण्याचा निर्णय घेतला. जयने आधी व्हिडीओ कॉल अ फ्रेन्ड लाइफलाईनचा वापर केला आणि आपल्या काकांसोबत बोलला. त्यांनी जयला सांगितलं की, बरोबर उत्तर खिचडी आहे. पण जयला हे उत्तर बरोबर वाटत नव्हतं. त्यामुळे त्याने दुसरी लाइफलाईन ५०-५० चा वापर केला. आता दोन पर्याय कबाब आणि खिचडी शिल्लक राहिले होते. तेव्हा जयने खिचडी हे उत्तर लॉक करण्यास सांगितले. आणि हेच उत्तर बरोबर होतं. (KBC: २५ लाख रूपयांच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहीत आहे का 'या' प्रश्नाचं उत्तर?)
या सोप्या प्रश्नावर जय ढोंडे याने त्याच्या दोन लाइफलाईन वापरल्याने अमिताभ बच्चन हे निराश झाले होते. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं. असं झालं असलं तरी पुढे जयने खेळ ठीकठाक खेळला आणि KBC मधून ३ लाख २० हजार रूपये जिंकून गेला.
५० लाखाच्या प्रश्नावर क्विट केला शो
दरम्यान, बुधवारी २५ लाखाच्या प्रश्नापर्यंत पोहोचता पोहोचता फरहतने आपल्या सर्व लाइफलाईन वापरल्या होत्या. असं असलं तरी उत्तरप्रदेशच्या रायबरेलीच्या फरहतने ५० लाख रूपयांच्या प्रश्नाचाही सामना केला.
काय होता प्रश्न?
५० लाख रूपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता की, १८५७ च्या उठावादरम्यान लखनौचं नेतृत्व करणाऱ्या बेगम हजरत महल यांचं खरं नाव काय होतं? याचे पर्याय होते A.बीबी मुबारिका, B.मेहर-उन-निसा, C.सिकंदर जहां, D.मुहम्मदी खानुम. या प्रश्नाचं उत्तर फरहतला ठामपणे माहीत नव्हतं. त्यामुळे तिने खेळ क्विट करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिला उत्तर गेस करायला लावलं आणि तिने A हा पर्याय निवडला. पण बरोबर उत्तर D होतं म्हणजेच मुहम्मद खानुम. फरहत खेळ क्विट करून २५ लाख रूपये जिंकून गेली.