कौन बनेगा करोडपती हा अमिताभ बच्चन यांचा रिअॅलिटी शो सध्या जोरात सुरू आहे. या शो चा नुकताच झालेला करमवीर एपिसोडही शानदार झाला. यात छत्तीसगढच्या एका गावातून फूलबासन यादव नावाची महिला आली होती. तर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी खेळात फूलबासन यांना साथ दिली. दोघींनीही फार चांगल्याप्रकारे खेळ पुढे सरकवला. आणि दोघींनी मिळून ते करून दाखवलं जे आतापर्यंत नव्या सीझनमध्ये करू शकलं नाही. फूलबासन देवी या शोमध्ये ५० लाख रूपये जिंकण्यात यशस्वी ठरल्या. या सीझनमध्ये ५० लाख रूपयांची रक्कम जिंकणाऱ्या त्या पहिल्या स्पर्धक ठरल्या.
काय होता ५० लाख रूपयांचा प्रश्न?
यातील कोण एक पर्यावरणवादी होते ज्यानी हिमाचल प्रदेशात बेकायदेशीर खोदकाम विरोधात लढाई लढली आणि त्यांना या विरोधात जोरदार आवाज उठवण्यासाठी ओळखलं जातं? (KBC मध्ये पहिल्याच सोप्या प्रश्नावर अडकल्याने करावा लागला दोन लाइफलाईनचा वापर आणि.....)
A- किंकरी देवी
B- दया बाई
C- मानसी प्रधान
D- चुनी कोटल
या प्रश्नाचं बरोबर उत्तर ए किंकरी देवी असं आहे. फूलबासन आणि रेणुका दोघीही या प्रश्नाबाबत कन्फ्यूज होत्या आणि दोघींनाही प्रश्नाचं बरोबर उत्तर माहीत नव्हतं. मात्र, त्यांच्याकडे एक मोठी लाइफलाईन शिल्लक होती. आस्क द एक्सपर्ट या लाइफलाईनचा त्यांनी वापर केला. एक्सपर्ट सोशल मीडियात चांगल्या अॅक्टिव राहत होत्या. त्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं. (KBC मध्ये ५० लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाला आलं नाही; तुम्हाला येतंय का ट्राय करा!)
फूलबासन यांच्याबाबत सांगायचं तर त्या एक महिला संघटना चालवतात. ज्यात साधारण २ लाखांपेक्षा जास्त महिला जोडल्या गेल्या आहेत. याचा उद्देश गाव आणि आजूबाजूच्या परिसराची सुरक्षा करणं, दारूबंदी आणि कायदा-सुव्यवस्थेची पाहणी करणं. गुलाबी साडीत या महिला रात्री घराबाहेर पडतात आणि गावात काहीही चुकीचं घडू नये याची काळजी घेतात. फूलबासन यांनी आपल्या विचारांनी सर्वांना प्रभावित केलं.