Join us

KBC मध्ये २५ लाखांसाठी 'जंगल बूक'चा प्रश्न, २ लाइफ-लाइन वापरूनही आलं नाही उत्तर, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 9:39 AM

स्पर्धक आनंद राजूकडे तिसरी लाइफलाईन शिल्लक होती, पण ती त्याला वापरताच आली नाही

Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये स्पर्धक आनंद राजू हॉटसीटवर बसला होता. तो रोल-ओव्हर स्पर्धक होता, ज्याने २८ ऑगस्टला पुढे प्रवास सुरू केला. आनंद राजूने ६ लाख ४० हजार रुपये जिंकले. यानंतर दुसऱ्या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन त्याने १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. आता त्याला २५ लाखांच्या प्रश्नासाठी खेळायचे होते. पण विचारलेल्या प्रश्नावर तो थांबला आणि गोंधळला. जाणून घेऊया सविस्तर-अमिताभ यांनी आनंद राजू यांना विचारलेला प्रश्न-

  • रुडयार्ड किपलिंग यांचे घर 'नौलखा', जिथे त्यांनी 'द जंगल बुक' लिहिले होते, ते कोणत्या देशात आहे? त्यात चार पर्याय होते-

A) अमेरिकाB) पाकिस्तानC) UKD) श्रीलंका

दोन लाईफलाईन वापरल्या, उत्तर देता आले नाही...

आनंदू राजू यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर माहित नव्हते. त्यामुळे त्यांनी लाइफलाइन 'ऑडियन्स पोल'चा वापर केला. पर्याय D ला प्रेक्षकांकडून जास्तीत जास्त मते मिळाली. मात्र आनंद राजू यांचे समाधान झाले नाही. त्यांना वाटले की उत्तर चुकीचे आहे. यानंतर त्यांनी 'व्हिडिओ कॉल अ फ्रेंड' ही दुसरी लाईफलाइन वापरली. पण आनंद राजू हा प्रश्न पूर्णपणे समजून देऊ शकले नाहीत आणि वेळ संपली.

तिसरी लाईफलाईन होती पण गेम सोडावा लागला...

आनंद यांच्याकडे एक लाइफलाइन शिल्लक होती. पण ती लाईफ लाईन 'डबल डिप' होती. या लाईफलाईनमध्ये स्पर्धकाला प्रश्नाची दोन वेळा उत्तर देण्याची संधी मिळते, म्हणजे पहिले उत्तर चुकले की अजून एक उत्तर देता येते. पण राजू कोणताही धोका पत्करायच्या मन:स्थितीत नव्हते, त्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. उत्तर चुकलं असतं तर आनंद राजू केवळ ३ लाख  २० हजार रुपयेच जिंकू शकले असते. पण खेळ सोडल्याने त्यांनी १२ लाख ५० हजार रूपये जिंकले. आनंद राजू ज्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत, त्याचे अचूक उत्तर अमेरिका असे होते.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनटेलिव्हिजन