सध्या 'कौन बनेगा करोपडती ज्युनिअर्स' हा शो चर्चेत आहे. भल्याभल्यांना जे जमलं नाही ते एका आठवीत शिकणाऱ्या १२ वर्षाच्या मुलाने करून दाखवलं आहे. 'कौन बनेगा करोडपती ज्युनिअर्स'मध्ये एका चिमुकल्याने एक कोटी जिंकत सगळ्यांनाच आश्चर्यतकित करून सोडलं. 'केबीसी'च्या हॉट सीटवर बसल्यानंतर अनेक जण गार पडतात. पण या चिमुकल्याने मात्र मोठ्या आत्मविश्वासाने १ कोटीपर्यंत मजल मारली . त्याचं ज्ञान पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.
मुळचा हरियाणाचा असलेल्या मयांकने केबीसीमध्ये सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तर देत १ कोटी जिंकले. त्याचं ज्ञान पाहून बिग बी अमिताभ बच्चनही थक्क झाले. १ कोटी जिंकल्यानंतर मयांक ७ कोटीच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन करोडपतीचा विजेता ठरेल का? याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. पण, मयांकला ७ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नसल्यामुळे त्याने खेळ सोडला. मयांकला १ कोटीसाठी "कोणत्या युरोपीय चित्रकाराला त्या मानचित्राचं श्रेय दिलं जातं ज्याने नव्यानेच शोध लागलेल्या खंडाला अमेरिका हे नाव दिलं होतं?" असा प्रश्न विचारण्यात आला होता.
A. अब्राहम आर्टेलियस
B. जेरार्डस मर्केटर
C. जियोवन्नी बटिस्टा एग्रीसी
D. मार्टिन वाल्डसीमुल्लर
या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यासाठी मयांकने लाइफलाइनचा वापर करत D. मार्टिन वाल्डसीमुल्लर हे उत्तर देत १ कोटी जिंकले होते. त्यानंतर ७ कोटीच्या प्रश्नासाठी मयांकला विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तराबाबत त्याला काहीच कल्पना नव्हती. "सुभेदार एनआर निक्कम आणि हवालदार गजेंद्र सिंह यांना दुसऱ्या महायुद्धादरम्यान कोणत्या शहरात पुरवठा केल्याप्रकरणी रुसकडून रेड स्टारने सन्मानित करण्यात आलं होतं," असा प्रश्न विचारण्यात आला होता.
A. तब्रिज
B. सिडॉन
C. बटूमि
D. अल्माटी
या प्रश्नाचं अचूक उत्तर माहीत नसल्याने मयांकने हा खेळ अर्ध्यावरच सोडला. या प्रश्नाचं अचूक उत्तर A. तब्रिज हे होतं. १ कोटी जिंकून मयांक ज्युनियर करोडपती ठरला.