Join us

"भविष्यात संधी मिळाली तर.."; KBC 16 च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी सांगितली मनातली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 15:05 IST

KBC 16 च्या मंचावर अमिताभ यांनी भारतीय सैन्याबद्दल गौरवाचे शब्द बोलून सर्वांचं मन जिंकलं

सध्या KBC 16 ची चांगलीच चर्चा आहे. अमिताभ बच्चन KBC 16 च्या होस्टिंगची जबाबदारी सांभाळत आहेत. अमिताभ त्यांच्या खास शैलीत KBC 16 चं सूत्रसंचालन करत आहेत. KBC 16 च्या मंचावर विविध तऱ्हेचे लोक हजेरी लावतात. अमिताभ प्रत्येक स्पर्धकाला बोलतं करुन त्यांच्या आयुष्याचे अंतरंग जाणून घेतात. अमिताभ यांनी नुकतंच KBC 16 च्या भागात भारतीय सैन्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली. काय म्हणाले बिग बी बघा.

अमिताभ सैन्याविषयी काय म्हणाले?

KBC 16 च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी सैन्याबद्दल मनातली गोष्ट सांगितली. बिग बी म्हणाले, "मला सैन्याबद्दल पहिली गोष्ट आकर्षित करते ती म्हणजे त्यांची वर्दी. युनिफॉर्म परिधान केल्यानंतर सर्वच बदलतं. हा गणवेश अनुशासन आणि गांभीर्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण करतो. प्रत्येक व्यक्तीने तीन किंवा चार महिन्यांची सैन्याची ट्रेनिंग घ्यावी, हे मी वारंवार सांगत आलोय. साहस आणि धैर्य म्हणजे काय? या गोष्टींचा खरा अर्थ आपल्याला सैन्यात गेल्यावर कळतो."

अमिताभ पुढे म्हणाले, "सैन्यात शिकवलेलं साहस आणि धैर्य देशातील आगामी परिस्थितीसाठी आपल्याला सक्षम बनवतं. मला असं वाटतं की प्रत्येकाने सैन्यात सहभागी होण्यासाठी विचार करावा. पुढे संधी मिळेल तर स्वेच्छेने मला सैन्यात जायला आवडेल." अशाप्रकारे बिग बींनी सैन्याविषयी गौरवाचे शब्द काढून सर्वांची मनं जिंकली. मास्टर डिग्री पूर्ण करुन पंजाबमध्ये राहणारी नेहा ही KBC 16 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होकी.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनभारतीय जवान