KBC 16 ची सध्या चांगलीच चर्चा आहे. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या खास अंदाजात KBC 16 चं सूत्रसंचालन करत आहेत. गेले अनेक सीझन अमिताभ यांनी त्यांच्या खास सूत्रसंचालनाने कौन बनेगा करोडपती शोचे अनेक पर्व गाजवले. आता KBC च्या १६ व्या पर्वासंबंंधी नवनवीन बातम्या समोर येत असतात. KBC 16 चं पर्व आधीच्या KBC पर्वांपेक्षा काहीसं कठीण वाटतंय. या पर्वामध्ये पहिले दोन टप्पे ओलांडताना कठीण प्रश्नांमुळे स्पर्धकांची दमछाक होताना दिसते. अशातच KBC 16 विषयीची एक बातमी समोर आलीय. एका स्पर्धकाचं उत्तर चुकल्याने त्याला २१ लाख गमवावे लागले.
स्पर्धकाने एका क्षणात गमावले २१ लाख
KBC 16 मध्ये प्रवीण नाथ नावाचा एक स्पर्धक सहभागी झाला होता. हुशारीच्या जोरावर मोठी रक्कम मिळवत या स्पर्धकाने २५ लाखाच्या प्रश्नापर्यंत मजल मारली. परंतु २५ लाखाच्या प्रश्नाचं उत्तर चुकल्याने या स्पर्धकाने २१ लाख एका क्षणात गमावले. काय होता तो प्रश्न. पुढीलप्रमाणे-- उस घोड़े का नाम क्या है जो 2024 पेरिस ऑलिम्पिक में ड्रेसेज इवेंट में सवारी करने वाले पहले भारतीय घुड़सवार अनुश अग्रवाल के साथ आया था? या प्रश्नाचे ऑप्शन होते A) सर कारमेलो ओल्ड B) डीकॅथलॉन C) सेंट सिमोन D) प्रिंसेस डोरीन
काय होतं या प्रश्नाचं उत्तर
प्रवीण नाथकडे कोणतीही लाइफलाईन शिल्लक नव्हती त्यामुळे प्रवीणने ऑप्शन बी डीकॅथलॉन निवडला. परंतु हे उत्तर चुकीचं होतं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतंऑप्शन A)सर कारमेलो ओल्ड. अशाप्रकारे उत्तर चुकल्याने प्रवीणने एका क्षणात २१ लाख गमावले. त्यामुळे खेळ सोडताना ३ लाख २० हजार रुपये विजयी रक्कम प्रवीणला मिळाली. प्रवीणच्या खेळाचं आणि त्यांच्या कामाचं बिग बींनी चांगलंच कौतुक केलं.