Join us

दोन लाईफलाईन वापरल्या तरीही हरला! १ लाख ६० हजाराच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:56 PM

१ लाख ६० हजाराच्या प्रश्नाचं उत्तर न देता आल्याने अवघे १० हजार रुपये घेऊन स्पर्धक घरी गेला. काय होता हा प्रश्न? (kbc 16)

सध्या KBC 16 ची चांगलीच चर्चा आहे. अमिताभ बच्चन गेल्या अनेक पर्वांपासून KBC अर्थात 'कौन बनेगा करोडपती'चं सूत्रसंचालन करत आहेत. अमिताभ यांच्या समोर हॉटसीटवर बसून जास्तीत जास्त रक्कम मिळवण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धक डोक्याचा हुशारीने वापर करतात. परंतु यात काहींना यश येतं तर काहींना अपयश. KBC 16 मध्ये अशीच एक गोष्ट घडली. जेव्हा १ लाख ६० हजाराच्या प्रश्नावर स्पर्धकाला उत्तर माहित नसल्याने खेळ सोडावा लागला.

१ लाख ६० हजाराच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही

KBC 16 मध्ये रणवीर रघुवंशी हा स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. हुशारीच्या जोरावर रणवीर ८० हजारांची रक्कम सहज जिंकतो. पुढे प्रश्न येतो १ लाख ६० हजार रुपयांचा. या प्रश्नाचं उत्तर रणवीरला माहित नसतं. तेव्हा तो दोन लाईफलाईनचा वापर करतो. 'डबल डिप' आणि 'फोन अ फ्रेंड' या लाईफलाईनचा वापर तो करतो. डबल डीप लाईफलाईनच्या वेळेस दोन संधी मिळूनही रणवीरला प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. त्यामुळे उत्तर चुकल्याने त्याला फक्त १० हजारांची रक्कम घेऊन समाधान मानावं लागतं.

 

काय होता १ लाख ६० हजाराचा प्रश्न?

१ लाख ६० हजाराचा प्रश्न तसा कठीणच होता. या प्रश्नात एक फोटो दाखवण्यात आला होता. त्यानंतर प्रश्न असा होता की, ‘यह राजमार्ग पर स्थित किन दो शहरों को जोड़ने के लिए प्रस्तावित किया गया था?’ यासाठी ऑप्शन चार होते. A. खार्तूम, जुबा B. सियोल, प्योंगयांग C. कीच, मास्को D. जेरूसलम, मक्का. या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन B. सियोल, प्योंगयांग. १ लाख ६० हजार या प्रश्नाचं उत्तर न दिल्याने केवळ १० हजार रुपये घेऊन रणवीरला खेळ सोडावा लागला.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनटेलिव्हिजन