सध्या 'कौन बनेगा करोडपती' अर्थात KBC 17 ची चांगलीच चर्चा आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या खास शैलीत KBC 17 चं सूत्रसंचालन करत आहेत. यंदाचा KBC 17 चं पर्व अनेक कठीण प्रश्नांनी भरलेलं आहे. काही स्पर्धक हुशारी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर KBC 17 मध्ये बाजी मारतात. तर काही स्पर्धक कठीण प्रश्नावर रिस्क न घेता खेळ सोडतात. KBC 17 मध्ये हिंदू धर्मग्रंथाविषयीच्या अशाच एका प्रश्नावर स्पर्धकाने खेळ सोडलाय. काय होता तो प्रश्न?
KBC 17 चा २५ लाखांचा प्रश्न
KBC 17 मध्ये हर्षा उपाध्याय या दिव्यांग महिला सहभागी झाल्या होत्या. हुशारीच्या जोरावर हर्षा यांनी खूप रक्कम जिंकली. परंतु २५ लाखांचा प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही. काय होता हा २५ लाखांचा प्रश्न. पुढीलप्रमाणे हिंदू ग्रंथों के अनुसार इनमें से क्या पृथ्वी के सात द्वीपों में से एक नहीं है? A. पुष्कर द्वीप B. कुश द्वीप C. क्रौंच द्वीपD. इक्षुरस द्वीप. हे चार ऑप्शन होते. परंतु हर्षा यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.
काय होतं या प्रश्नाचं उत्तर
हर्षा यांनी या प्रश्नासाठी सुरुवातीला व्हिडीओ कॉल ही लाईफलाईन वापरली. परंतु ही लाईफलाईन त्यांना उपयोगी झाली नाही. पुढे हर्षा यांनी डबल डीप लाईफलाईनचा वापर केला. परंतु उत्तर माहित नसल्याने समजुतदारपणाचा वापर करत त्यांनी गेम क्विट केला. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन D. इक्षुरस द्वीप. सध्या KBC 17 ची चांगलीच उत्सुकता असून बिग बी त्यांच्या खास शैलीत KBC 17 चं खुमासदार सूत्रसंचालन करत आहेत.