'कौन बनेगा करोडपती'मध्ये मंगळवारच्या एपिसोडमध्ये हॉटसीटवर छत्तीसगढच्या अंकिता नावाच्या स्पर्धक होत्या. त्यांनी खेळाला चांगली सुरूवात करत १० हजार आणि ३ लाख २० हजाराचा टप्पा पार केला. अंकिता जेव्हा १२ लाख २० हजाराच्या टप्प्यावर पोहचल्या तेव्हा त्यांच्या सर्व लाइफलाईन संपल्या होत्या.
पण तरी सुद्धा अंकिता यांनी समझदारी दाखवत आणि शांतपणे प्रश्नाचं उत्तर दिलं. या उत्तराने अंकिता या २५ लाख रूपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या. आता सर्वांनाच हुरहुर लागली होती. अशात अमिताभ बच्चन यांनी अंकिता यांच्यासमोर २५ लाख रूपयांचा प्रश्न ठेवला. भारतात एफ-१६ फॉल्कन लढावू विमान उडवणारे पहिले भारतीय सैनिक नसलेले सर्वासामान्य व्यक्ती कोण होते? (क्या बात! KBC मध्ये स्वप्निल चव्हाणने जिंकले २५ लाख, कामगारांना पगार देऊन सन्मानानं परत बोलवणार!)
अंकितांसमोर हा प्रश्न येताच त्या जरा चक्रावल्या. पण पर्याय समोर आल्यावर त्यांना काही शक्यता जाणवू लागल्या होत्या. नियमानुसार अमिताभ बच्चन यांनी अंकिता यांना उत्तराचे चार पर्याय दिलेत. A. जेआरडी टाटा B. रतन टाटा C. राजीव गांधी D. राजेश पायलट. अंकिता या प्रश्नाच्या उत्तरावर बराचवेळी विचार करत होत्या. पण त्यांना नेमकं उत्तर नाही नव्हतं. (KBC: प्रश्न विचारताच हॅंग झाला अमिताभ बच्चन यांचा कॉम्प्युटर, अशी सांभाळली त्यांनी सिच्युएशन...)
काय होतं प्रश्नाचं उत्तर?
खूप विचार केल्यावर आणि उत्तराबाबत श्वाश्वती नसल्याने अंकिता यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. अंकिताने खेळ सोडण्यापूर्वी ऑप्शन बी म्हणजेच रतन टाटा हे उत्तर गेस केलं. पण अंकितांना नंतर फार पश्चाताप झाला. कारण त्यांनी जे उत्तर खेळ सोडल्यावर गेस केलं होतं तेच बरोबर उत्तर होतं. असो अंकिता या १२ लाख ५० हजार रूपये जिंकून गेल्या. पण त्यांची रिस्क घेतली असती तर आणखी जिंकू शकल्या असत्या.