Join us

'बिग बॉस' ७० दिवसातच का संपवला? केदार शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले, "हा निर्णय..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 3:12 PM

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) काही दिवसांपूर्वीच संपला. रितेश देशमुखने आपल्या 'लय भारी' स्टाईलने हा सीझन होस्ट केला. त्याचा 'भाऊचा धक्का' विशेष गाजला. या सीझनचा टीआरपी सर्वात जास्त होता. तरी शो १०० नाही तर ७० दिवसातच संपल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. स्पर्धकांनाही घरात असताना ऐनवेळेस ही माहिती दिली गेली. आता नुकतंच कलर्स चॅनलचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

बिग बॉस संपल्यानंतरची केदार शिंदेंची पहिली मुलाखत 'लोकमत फिल्मी'वर प्रसारित करण्यात आली आहे. बिग बॉस ७० दिवसातच का संपला असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, "काही गोष्टी मॅनेजमेंट लेव्हलच्या असतात. ते आम्हाला याचे परिणाम दुष्परिणाम समजावून सांगतात जे अख्ख्या नेटवर्क साठी असतात. त्याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला होता. टिपरे मालिकेनंतर मला सवय लागली होती की कधी बंद करताय असं लोकांनी विचारु नये. आज उलट होतंय. लोक विचारतात की ७० दिवसच का ठेवलंत. चांगलंय ना थोडीशी खोडी लागलेली आणि रुखरुख लागलेली चांगली असते."

केदार शिंदे यांचा हा 'बिग बॉस'चा पहिलाच अनुभव होता. या प्रवासाचाही त्यांनी मुलाखतीत उलगडा केला. तसंच इतर सदस्यांविषयीही त्यांनी मत मांडलं. आता पुढचा सीझन कधी येणार, यातही रितेशच होस्ट असणार का यावरही ते बोलले आहेत. 

टॅग्स :केदार शिंदेबिग बॉस मराठी