मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) तिच्या पोस्टमुळे जास्त चर्चेत असते. शरद पवारांवरील एक पोस्ट केवळ शेअर केल्यामुळे तिला तुरुंगाची हवा खावी लागली. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही केतकीने तिची वक्तव्यं सुरुच ठेवली आणि ती पुन्हा चर्चेत येत गेली. आता काय तर तिचं फेसबुक अकाऊंटच लॉक झालंय. आणि हा राग तिने इन्स्टाग्रामवर बोलून दाखवला आहे.
केतकीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, "माझे फेसबुक(Facebook) अकाउंट लॉक केलं गेलं आहे आणि इन्स्टाग्रामवर मला ब्रँडेड कंटेट पोस्ट करता येणार नाहीए. मेटा (Meta) पुन्हा पुन्हा राईट विंग लोकांना दाबू पाहत आहे.
मी अजूनही ट्विटरवर आहे. 'विकिची' vikichi हे माझं हँडल आहे.
YouTube वर: epilepsy_warrior_queen
आणि एक नवीन चॅनेल "Let's Talk"
Spotify, Google, Amazon वर माझे पॉडकास्ट: केल्फीगर्लसोबत जीवन जगणे
आणि कदाचित मी लवकरच इतर सोशल मीडियावर येईन किंवा माझी स्वतःची वेबसाइट सुरू करेन जिथे मी सत्याचा उलगडा करत राहीन..सध्या ट्विटरवर भेटत राहूच.
केतकीच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया आल्यात. काही लोकांनी तिला पाठिंबा दिलाय तर काही जणांनी मात्र तिला ट्रोलच केलं आहे. मात्र केतकी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तिचं म्हणणं मांडणारच असंच दिसतंय.